अरे देवा! पतीऐवजी मोबाइलची निवड केली अन् घर सोडून गेली, 15 दिवसांआधीच झालं होतं लग्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 09:18 AM2023-06-01T09:18:11+5:302023-06-01T09:18:26+5:30
साधारण 14 दिवसांआधी हाजीपूरच्या लालगंज भागात राहणाऱ्या इलियासचं लग्न हाजीपूरमध्ये राहणारी सबा खातूनसोबत झालं होतं. निकाह मोठ्या धडाक्यात करण्यात आला.
बिहारच्या हाजीपूरमध्ये पती-पत्नीच्या वादाची एक फारच अजब घटना समोर आली आहे. इथे एका नव्या नवरीने फक्त मोबाइलसाठी आपल्या पतीला सोडलं. त्यांच्या लग्नाला अजून 15 दिवसही पूर्ण झालेले नव्हते. सतत मोबाइलवर राहत असल्याने पतीने पत्नीला रागावलं होतं. अशात त्याने सासरच्या लोकांना बोलवलं, तेव्हा नवरीच्या भावाने भाओजीवर बंदुक ताणली. त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेलं. भावाला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडील पिस्तुल ताब्यात घेण्यात आलं. तेच नवरीने आपलं सासर सोडलं आणि माहेरी परत आली.
साधारण 14 दिवसांआधी हाजीपूरच्या लालगंज भागात राहणाऱ्या इलियासचं लग्न हाजीपूरमध्ये राहणारी सबा खातूनसोबत झालं होतं. निकाह मोठ्या धडाक्यात करण्यात आला. सासरी आल्यानंतर सबाच्या हातात सतत मोबाइल राहत होता. पती इलियास आणि त्याच्या परिवार सबाच्या या गोष्टीमुळे फार वैतागले होते.
दिवस निघाल्यापासून ते सायंकाळपर्यंत सबा सतत सोशल मीडियावर अॅक्टिव राहत होती. घरात अजिबात लक्ष देत नसल्याने पती इलियासने तिला फोनवरून बोलणं सुरू केलं.
सासू आणि सासऱ्यांनीही तिला मोबाइलच्या इतक्या वापरासाठी रागावलं. सबा हे आवडलं नाही. सबाने आपल्या आईला फोन केला आणि रडत रडत हे सगळं सांगितलं. मुलीचं ऐकल्यानंतर तिची आई, भाऊ आणि परिवारातील इतर सदस्य मुलीच्या सासरी आले.
इथे आल्यानंतर सबाच्या वागण्यावरून वाद सुरू झाला. सासरच्या लोकांनी आपलं म्हणणं मांडलं. पण काही मार्ग निघण्याऐवजी जेव्हा बहिणीच्या डोळ्यात भावाने पाणी पाहिलं त्याने भाओजीवर बंदुक ताणली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
यादरम्यान कुणीतरी पोलिसांना या भांडणाची सूचना दिली. पोलिसांनी सगळ्यांना पोलीस स्टेशनला नेलं. इलियासवर बंदुक ताणलेल्या महिलेच्या भावाला अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन्हीकडील बाजू ऐकून घेतली. अशात सबाने मोबाइलऐवजी पतीला सोडणं योग्य मानलं. ती तिच्या माहेरच्या लोकांसोबत परत गेली.