पत्नीने वाचले पतीचे डिलीट केलेले मेसेज, झाला दोघांचा घटस्फोट; आता व्यक्तीने कंपनीवर ठोकला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 11:05 AM2024-06-18T11:05:03+5:302024-06-18T11:10:07+5:30
मेसेज वाचल्यावर त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली. आता या व्यक्तीने अॅप्पल कंपनीवर कोट्यावधी रूपयांची केस केली आहे.
मोबाईल फोनमुळे एकीकडे काही कामे सोपी झाली आहेत. तर काही लोकांना मोबाईलच्या वेगवेगळ्या टेक्निकमुळे मोठं नुकसानही होतं. एका व्यक्तीच्या पत्नीने त्याचे फोनमधील मेसेज वाचले. त्याला वाटलं होतं त्याने हे मेसेज डिलीट केले. हे मेसेज वाचल्यावर त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली. आता या व्यक्तीने अॅप्पल कंपनीवर कोट्यावधी रूपयांची केस केली आहे. पत्नीने पतीचे सेक्स वर्कर्सना पाठवलेले मेसेज वाचले होते.
व्यक्तीने हे मेसेज आयफोनमधून डिलीट केले होते. पण त्याचा आयफोन परिवाराच्या आयमॅकसोबत जोडलेला होता आणि मेसेज त्याच्याकडून डिलीट झाले नसल्याने घटस्फोटाची वेळ आली. आता इंग्लंच्या या उद्योगपतीने अॅप्पल कंपनीला कोर्टात खेचलं आहे. द टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीला आपली ओळख जगासमोर आणायची नाही. सेक्स वर्कर्ससोबत बोलण्यासाठी ही व्यक्ती आयमेसेजचा वापर करत होती.
उद्योगपतीचा दावा आहे की, त्याने त्याच्या आयफोनमधून मेसेज डिलीट केले होते. पण परिवाराचे डिवायसेसे एकाच अॅप्पल आयडीसोबत जुळलेले असल्याने आयमॅकवर अजूनही मेसेज वाचले जाऊ शकत होते. तो म्हणाला की, कंपनीने हे नाही सांगितलं की, एका डिवाइसवरून मेसेज डिलीट केल्यावर ते सगळ्या लिंक केलेल्या डिवाइसवरूनही डिलीट होत नाहीत.
द टाइम्सने सांगितलं की, व्यक्तीच्या पत्नीने हे मेसेज वाचले आणि तिने घटस्फोटाची नोटीस पाठवली. त्याला पत्नीला साधारण ५२ कोटी ९२ लाख रूपये द्यावे लागले. जर मेसेज तिने वाचले नसते तर घटस्फोट झाला नसता.
तो म्हणाला की, अॅप्पल कंपनीकडून मेसेज डिलीट करण्याबाबत स्पष्टता नसल्याने असं झालं. अॅप्पलने मला सांगितलं की, माझे मेसेज डिलीट केले आहेत. पण मुळात तसं काही झालंच नाही. जर मेसेजमध्ये असं लिहिलं असतं की, हे मेसेज केवळ याच डिवाइसवरून डिलीट झाले आहेत आणि दुसऱ्या लिंक असलेल्या डिवाइसवर दिसतील. तरीही असं झालं नसतं.