'माझ्या वडिलांनी हुंडा दिलाय, मी स्वयंपाक करणार नाही', पती-पत्नीच्या वादाची अजब घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 05:09 PM2023-05-30T17:09:38+5:302023-05-30T17:10:18+5:30
पत्नी पतीला म्हणाली की, हुंड्यात जी रक्कम मिळाली त्यातून एक कामाला बाई ठेवा. स्वत: जेवण बनवून खा आणि मलाही खाऊ घाला.
उत्तर प्रदेशच्या आग्रामधून एक पती-पत्नीच्या वादाची एक अजब घटना समोर आली आहे. पत्नी म्हणाली की, तिच्या वडिलांनी हुंडा दिला आहे. त्यामुळे ती स्वयंपाक करणार नाही. इतकंच नाही तर पत्नी पतीला म्हणाली की, हुंड्यात जी रक्कम मिळाली त्यातून एक कामाला बाई ठेवा. स्वत: जेवण बनवून खा आणि मलाही खाऊ घाला.
या गोष्टीवरून पती-पत्नीमधील वाद वाढला. नंतर पत्नीने पती आणि सासूविरोधात हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पती आणि पत्नीला काउन्सेलिंग सेंटरमध्ये बोलवण्यात आलं. काउन्सेलरने दोघांसोबत चर्चा केली.
पतीने सांगितलं की, पत्नी घरातील कोणतंच काम करत नाही. जेवणही बनवत नाही आणि काही बोललं तर भांडण करते. काउन्सेलर पत्नीसोबत बोलले तर तिने स्पष्टपणे सांगितलं की, तिच्या वडिलांनी लग्नात खूप मोठा हुंडा दिला. तिला जेवण बनवता येत नाही. पती आणि सासूसाठी जेवण बनवणार नाही.
सोबतच घरातील कोणतं कामही करणार नाही. हुंड्यात मिळालेल्या रकमेतून एक कामाला बाई ठेवा. महिलेचं हे अजब बोलणं ऐकून काउन्सेलरही हैराण झाले. त्यांच्याकडे महिलेला समजावण्यासाठी एकही शब्द नव्हता.
काउन्सेलरने दोन्हीकडील बाजू ऐकल्यानंतर पुन्हा पुढील आठवड्यात बोलवलं. सध्या ही घटना काउन्सेलिंग सेंटरमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी एखादं छोटं कामही करत नाही आणि दिवसभर फोनवर असते.
महिलेचं लग्न 3 वर्षाआधी एका तरूणासोबत झालं होतं. तरूण एका खाजगी कंपनीत काम करतो. पती-पत्नी दोघेही उच्च शिक्षित आहे. पण घरातील कामावरून दोघांमध्ये वाद होतो.