ऑनलाईन ग्रुपवर पतीच्या चुगल्या करायची पत्नी, पती त्याच ग्रुपचा मेंबर होता हे नव्हतं माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 04:49 PM2022-04-29T16:49:58+5:302022-04-29T16:50:01+5:30
एका ऑनलाइन ग्रुपवर आपल्या पतीविषयीच्या तक्रारी करायची (Woman Complaining about Husband in Online Group). मात्र एक दिवस तिचा नवराच या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून सामील झाला.
कोणत्याही नात्याबद्दल बोलायचं झालं, तरी त्या नात्यात कधीकधी अशी परिस्थिती येते, की एका व्यक्तीला दुसऱ्याबद्दल अनेत तक्रारी असतात. अशा परिस्थिीतीत आपल्या मनातील राग आपण बोलून दाखवला आणि ते सर्व समोरच्या व्यक्तीला समजलं तर त्यापेक्षा वाईट काय असेल. एका महिलेसोबतही असंच घडलं, ती एका ऑनलाइन ग्रुपवर आपल्या पतीविषयीच्या तक्रारी करायची (Woman Complaining about Husband in Online Group). मात्र एक दिवस तिचा नवराच या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून सामील झाला.
महिलेचे तिच्या पतीसोबत चांगले संबंध (Husband Wife Relation) होते, परंतु तिला या नात्यात काही समस्या जाणवत होत्या. यामुळे आपलं मन हलकं करण्यासाठी ही महिला एका ऑनलाइन ग्रुपमध्ये सामील झाली होती. इथे ती तिच्या नात्यातील समस्या सांगायची. मात्र, तिला हे माहित नव्हतं की ज्या गोष्टी बोलून तिचं मन हलकं होत होतं, त्या तिच्यासाठी त्रासदायक ठरणार आहेत.
Slate.com’s च्या कॉलममध्ये लिहिताना महिलेने सांगितलं की - काही महिन्यांपूर्वी मी एका ऑनलाइन ग्रुपमध्ये सहभागी झाले होते. जिथे लोक त्यांच्या नात्यातील समस्यांबाबत चर्चा करत असत. पतीवर राग काढण्याऐवजी अनोळखी लोकांसमोर आपली समस्या सांगून आपलं मन हलकं करावं, असं या महिलेला वाटलं. दरम्यान, महिलेला आपल्या पतीच्या वागण्यात थोडा बदल होत असल्याचं जाणवू लागलं. विशेषत: पतीच्या ज्या गोष्टी तिला खटकायच्या त्याबाबत तिला हा बदल जाणवला. काही दिवस असेच चालले आणि मग तिला कळालं की तिचा नवरा असं का करतोय.
शेवटी महिलेला समजलं की पती त्याच ग्रुपमध्ये सदस्य म्हणून सामील झाला होता, ज्यावर ती त्याच्याबद्दल तक्रारी करत असे. नवरा बायकोच्या सगळ्या गोष्टी वाचायचा, पण तो तिला कधीच काही बोलला नाही. या पोस्टवर टिप्पणी करताना, अनेकांनी सांगितलं की पतीपर्यंत आपलं मत पोहोचवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. काही लोक असेही म्हणाले की पतीने स्वतःमध्ये बदल केला असेल तर ते चांगले आहे, परंतु आता महिलेनं ही गोष्ट पतीला सांगावी की त्याच्या ऑनलाइन ग्रुपमधील उपस्थितीबद्दल तिला माहिती आहे.