8 दिवसांपर्यंत पतीची वाट बघत राहिली, शार्कच्या पोटात सापडला त्याचा हात....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:35 PM2023-03-01T12:35:07+5:302023-03-01T12:38:22+5:30

बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केला. 8 दिवसांनंतर महिलेच्या पतीबाबत एक माहिती मिळाली जी ऐकून परिवाराच्या पायाखालजी जमीन सरकली.

Wife waiting for missing husband for 8 days his hand found in sharks stomach | 8 दिवसांपर्यंत पतीची वाट बघत राहिली, शार्कच्या पोटात सापडला त्याचा हात....

8 दिवसांपर्यंत पतीची वाट बघत राहिली, शार्कच्या पोटात सापडला त्याचा हात....

googlenewsNext

अर्जेंटीनाहून एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. डिएगो एलेजांद्रो बॅरिया 18 फेब्रुवारीला चुबुत प्रांतात त्याच्या एटीवी क्रॉस कंट्री ड्राइववर निघाला होता. पण घरी त्याची वाट बघत असलेली त्याची पत्नी तेव्हा चिंतेत पडली जेव्हा 8 दिवस त्याची खबर मिळाली नाही. अशात पोलिसांकडे मदत मागण्याशिवाय तिच्याकडे उपाय नव्हता. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केला. 8 दिवसांनंतर महिलेच्या पतीबाबत एक माहिती मिळाली जी ऐकून परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली. असं समजलं की, एका समुद्री जीवाच्या पोटात डिएगोचे अवशेष सापडले.

कशी पटवली ओळख?

पत्नीला पतीची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आलं. तिला त्याचे अवशेष दाखवण्यात आले. ते अवशेष तिच्या पतीचेच होते. ज्यावर गुलाबाची टॅटू होता. डॉग शार्कच्या पोटात तिच्या पतीचे अवशेष सापडले होते. मासे पकडणाऱ्या लोकांच्या जाळ्यात डॉग शार्क अडकला होता. त्याच्या शरीरात मनुष्याचे अवशेष दिसल्याने त्यांनी लगेच नौसेनेला याची माहिती दिली. ही घटना 26 फेब्रुवारीची आहे. 

मृतदेहाची ओळख पटवण्याआधी कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस चौकशी करत होते. तेव्हा त्यांना एका ठिकाणी डिएगोची तुटलेली क्वाड बाइक आणि हेलमेट दिसला होता. त्यानंतर पत्नी वर्जिनिया चिंतेत होती. त्यानंतर सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

वर्जिनियाने लिहिलं होतं की, 'फक्त एक संकेत ज्याने मी तुम्हाला शोधू शकेन. प्लीज मला सोडून जाऊ नका. मी देवाकडे प्रार्थना करते की, तुम्ही मला लवकरच दिसाल. मी तुमची वाट बघत आहे. मला असं घाबरवू नका'.

Web Title: Wife waiting for missing husband for 8 days his hand found in sharks stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.