"मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीनं करावा...", पत्नीची विचित्र मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:38 PM2024-07-01T14:38:11+5:302024-07-01T14:39:24+5:30
Extramarital Affairs : एका पत्नीने आपल्या पतीकडून विचित्र मागणी केली आहे.
सध्या विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे सामान्य झाली आहेत. नवरा असो वा बायको, लग्नानंतरही लोकांचे दुसऱ्यासोबत अफेअर असल्याची अनेक प्रकरणे दिसून येतात. दरम्यान, उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील एका पत्नीने आपल्या पतीकडून विचित्र मागणी केली आहे.
पत्नीला आता आपल्या पतीसोबत राहायचे नाही. तिला तिच्या दोन्ही मुलींना सोबत ठेवायचे आहे आणि तिला स्वत:ला प्रियकरासोबत राहायचे आहे. मात्र, यासाठी येणारा सर्व खर्च पतीने करायचा आहे, अशी मागणी पत्नीची आहे. पण, पत्नी प्रियकरसोबत राहिली तर तिला एक रुपयाही देणार नाही, यावर पती सुद्धा ठाम आहे.
हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले आहे. यादरम्यान, महिलेने समुपदेशकासमोर ही गोष्ट सांगितल्यानंतर ते सुद्धा हैराण झाले. यावेळी ती म्हणाली, "माझा आणि दोन्ही मुलींचा सर्व खर्च पतीने करावा. मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहायचे आहे. दोन मुली मला नवऱ्यापासून झाल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या खर्चाची जबाबदारी नवऱ्याची आहे."यावर पतीच म्हणणे आहे की, जर पत्नी माझ्यासोबत राहातच नाही, तर मी का तिचा खर्च देऊ? जर ती प्रियकरासोबत राहत असेल, तर तिने आपला खर्च उचलावा.
दरम्यान, समुपदेशकाने महिलेला विचारले, तुम्ही असे का करत आहेत? यावर ती म्हणाली, नवरा बऱ्याचदा बाहेर असतो. तो मला वेळ देऊ शकत नाही. मला एकटेपणा वाटायचा. यादरम्यान माझे प्रेमसंबंध निर्माण झाले. माझा बॉयफ्रेंड विवाहित आहे. त्यालाही मुलं आहेत. तो आधीच आपल्या कुटुंबाला आधार देत आहे. अशा परिस्थितीत तो माझा खर्च उचलू शकत नाही. माझा आणि माझ्या मुलींचा खर्च माझ्या पतीने उचलावा, असे माझे म्हणणे आहे.
काय म्हणाले समुपदेशक?
समुपदेशक डॉ. अमित यांनी सांगितले की, दोघांच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. पत्नी हातरस येथील रहिवासी आहे. त्यांचे पती आग्रा येथील रहिवासी आहेत. पत्नीला आता प्रियकरसोबत राहायचे आहे. मात्र ती पतीकडून मासिक खर्चाचीही मागणी करत आहे. पण, पती खर्च उचलण्यासाठी तयार नाही. सध्या दोघांमध्ये काही तडजोड झालेली नाही. अशा स्थितीत त्यांना पुढील तारीख देण्यात आली आहे.