पवनचक्कीची मिळते ऊर्जा रेल्वेचा वायू वेगाने प्रवास
By admin | Published: January 13, 2017 12:47 AM2017-01-13T00:47:52+5:302017-01-13T00:47:52+5:30
रेल्वे सुसाट धावते, तेव्हा ती वाऱ्याच्या वेगाने धावत होती किंवा ती वाऱ्याशी स्पर्धा करीत होती
अॅम्स्टरडॅम : रेल्वे सुसाट धावते, तेव्हा ती वाऱ्याच्या वेगाने धावत होती किंवा ती वाऱ्याशी स्पर्धा करीत होती, असे म्हटले जाते, पण नेदरलँडमध्ये प्रत्यक्ष वाऱ्यावरच रेल्वे गाड्या धावतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरे आहे. नेदरलँडमध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणाऱ्या ऊर्जेवर रेल्वे धावतात. नॅशनल रेल्वे कंपनी एनएसने ही माहिती दिली आहे. आमच्या १00 रेल्वेगाड्या १ जानेवारीपासून वाऱ्यावर धावत आहेत, अशी माहिती प्रवक्ते टॉन बून यांनी दिली आहे. तेथील एनएस या रेल्वे कंपनीने दोन वर्षांपूर्वी निविदा काढल्या होत्या. डचमधील इनेकोने या इलेक्ट्रिक कंपनीने निविदा भरून कंत्राट मिळवले. त्यानंतर, दोघांमध्ये १0 वर्षांचा करार झाला. यामध्ये सर्व गाड्या वाऱ्याच्या ऊर्जेवर चालवण्याचे ठरले होते आणि जानेवारी २0१८पर्यंत हे सारे करायचे होते.