बोंबला! पेनकिलर समजून महिलेने गिळला वायरलेस हेडफोन, वाचा मग काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 12:53 PM2021-11-20T12:53:54+5:302021-11-20T12:56:25+5:30
महिलेने तिच्या या मूर्खपणाचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. सुदैवाने हेडफोन गिळणाऱ्या या महिलेला जास्त काही झालं नाही.
अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने चुकून पेनकिलर समजून तिचा वायरलेस हेडफोन गिळला. जेव्हा तिच्या हे लक्षात आलं तेव्हा ती जोरजोरात रडत होती. महिलेने तिच्या या मूर्खपणाचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. सुदैवाने हेडफोन गिळणाऱ्या या महिलेला जास्त काही झालं नाही.
एका हातात होती गोळी दुसऱ्या हातात हेडफोन
'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्सची राहणारी कार्लीने कॅमेरासमोर रडत आपली चूक सांगितली. ती म्हणाली की, 'मी बेडवर आराम करत होते. माझ्या हातात वायरलेस हेडफोन होता आणि दुसऱ्या हातात पेनकिलर टॅबलेट. मी पाण्याची बॉटल उचलली आणि टॅबलेट समजून हेडफोन गिळला. नंतर मला जाणीव झाली की, मी टॅबलेट नाही तर हेडफोन गिळला.
पोटात ऐकू येत होतं म्युझिक
कार्लीने सांगितलं की, ही घटना पाच नोव्हेंबरची आहे. त्या दिवशी ती तिच्या एका मैत्रिणीच्या घरी थांबली होती. तिथे तिने पेनकिलर समजून हेडफोन गिळता. त्यावेळी तिला जाणवलं नाही की, तिने जे गिळली की टॅबलेट नव्हती. ती म्हणाली की, 'परत येताना जेव्हा मला माझा हेडफोन सापडला नाही तेव्हा मी त्यांचं लोकेशन सर्च केलं. लोकेशन माझ्याजवळच दाखवत होतं. त्यानंतर मी म्युझिक सुरू केलं, तर आवाज पोटोतून येत होता'.
लगेच गेली डॉक्टरकडे
यानंतर महिला घाबरली आणि लगेच डॉक्टरकडे गेली. जेव्हा एक्स-रे मध्ये स्पष्ट झालं की, हेडफोनने तिचा कोणताही आतील अवयव डॅमेज झाला नाही तेव्हा तिने मोकळा श्वास घेतला. कार्लीला हे समजत नव्हतं की, हेडफोन बाहेर कसा येणार. सर्जरी करावी लागेल का? पण दुसऱ्या दिवशी नैसर्गिकपणे हेडफोन बाहेर आला.