Jara Hatke: महिनाभरात मुले होतात दोन वर्षांची, दक्षिण कोरियातील लोकांचं वय बनलंय रहस्य,नेमका प्रकार काय? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 02:08 PM2022-04-21T14:08:01+5:302022-04-21T14:08:32+5:30
Jara Hatke, South Korean children: तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की दक्षिण कोरियामधील लोकांचं वय हे झटपट वाढतं. मुलांनी जन्म घेतल्यानंतर काही आठवड्यातच त्यांचं वय दोन वर्षांपर्यंत वाढतं.
सेऊल - तुम्ही जगभरात कोरियन लोकांचं सौंदर्य आणि त्यांच्या तरुण लूकचं कौतुक ऐकलं असेल. नेहमी लोक कोरियन लोकांसारखी ग्लॉस स्किन मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की दक्षिण कोरियामधील लोकांचं वय हे झटपट वाढतं. मुलांनी जन्म घेतल्यानंतर काही आठवड्यातच त्यांचं वय दोन वर्षांपर्यंत वाढतं.
फार कमी लोकांना माहिती असेल की, दक्षिण कोरियामध्ये लोकांचं वय निश्चित करण्याची कुठलीही एक बद्धत नाही आहे. अनेक जुन्या पद्धतींनी वय मोजलं जातं. जिथे भारतामध्ये व्यक्तीचा जन्मदिवस आणि वर्षापासून त्यांचं वय निर्धारित केलं जातं. तर दक्षिण कोरियामध्ये याची पद्धत थोडी वेगळी आहे. येथे वर्ष बदलताच व्यक्तीचं वय बदलतं.
दक्षिण कोरियामध्ये वय मोजण्याची अशी कुठलीही पद्धत नाही आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली नाही. जेव्हा दक्षिण कोरियामध्ये जेव्हा बाळाचा जन्म होतो, तेव्हाच त्याचं वय एक वर्ष एवढं मानलं जातं. ही या देशातील वय मोजण्याची प्रचलित पद्धत आहे. या पद्धतीनुसार जर कुठल्याही बाळाचा जन्म या वर्षी डिसेंबरमध्ये झाला तर जानेवारी महिना सुरू होताच त्याचं वय दोन वर्षे एवढं मानलं जातं. तसेच एका दिवसाच्या मुलाचं वय हे सुद्धा एक वर्ष मानलं जातं. कोरियन एज सिस्टिमची हीच खासियत आहे.
एवढंच नाही तर एका अन्य एज सिस्टिमनुसार मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याचं वय शून्य मानलं जातं. मात्र दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या मुलाचं वय वाढतं. त्याचा तारीख आणि महिन्याशी काहीही संबंध नसतो. दक्षिण कोरियाच्या वय मोजण्याच्या या अजब पद्धतीमुळे आता एक अधिकृत पद्धत तयार केली जाणार आहे. आता ही पद्धत कायदेशीर झाली तर येथील लोकांचं कागदोपत्री वय अचानक एक वर्षांने कमी होईल. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती सुय यिओल याला लागू करण्याच्या प्रयत्नात आहेत. बीबीसीच्या रिपोर्टनुसार राष्ट्रपतींनी सांगितले की, यामुळे भ्रमासारखी परिस्थिती निर्माण होते. तर सामाजिक आणि आर्थिक नुकसानही होतं.