चंद्र ग्रहणानंतर खरंच त्सुनामी येते का?  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:19 PM2020-01-09T15:19:10+5:302020-01-09T15:25:59+5:30

चंद्र ग्रहणाशी संबंधित लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत.

Wolf moon eclipse 2020: Reason of tsunami every fact about Chandra grahan | चंद्र ग्रहणानंतर खरंच त्सुनामी येते का?  

चंद्र ग्रहणानंतर खरंच त्सुनामी येते का?  

googlenewsNext

चंद्र ग्रहणाशी संबंधित लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. अनेकदा असं म्हटल जातं कि चंद्र ग्रहणानंतर त्सूनामी येते. किंवा मोठं वादळ येतं असा  सुध्दा समज आहे. पण तुम्हाला याबाबत म्हणेच चंद्र ग्रहणाशी निगडीत  काही गोष्टी माहीत आहेत का?  आज आम्ही तुम्हाला या गैरसमजांशी निगडीत सत्य काय आहे  ते सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया चंद्र ग्रहणानंतर खरचं त्सुनामी येते हे कितपत सत्य आहे. 

 २०२० या वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण १० जानेवारीला रात्री १० वाजून ३७ मिनिटांनी सुरू होईल.  हे ग्रहण ११ जानेवारीला २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. या ग्रहणाचा संपूर्णवेळ ४ तास ६ मिनीटांचा असेल. हे ग्रहण भारत, यूरोप, अफ्रीका, आशिया आणि आस्ट्रेलिया येथे दिसणार आहे.  जेव्हा सूर्य आणि चंद्र यांचामध्ये पृथ्वी येते. तेव्हा चंद्रग्रहण लागतं. म्हणजेच चंद्राच्या संपूर्ण एका भागावर सूर्याचा प्रकाश पडत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण असतं. पण चंद्रग्रहणामुळे कधीच त्सुनामी येत नाही. पण लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात त्यामुळे एका प्रकारचं भितीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. चंद्रग्रहणामुळे त्सुनामी येईल असं अनेकांना वाटतं असतं.  प्रत्यक्षात असं काहीही होत नसतं. 


चंद्र ग्रहणाच्यावेळी चंद्र लाल का दिसतो? 

ज्यावेळी चंद्रग्रहण असते त्यावेळी चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडत नसतो. त्यामुळे  लाल रंग दिसून येतो. यावेळी  सूर्य, पृथ्वी,  चंद्र एकाच रांगेमध्ये असतात. 

याचा परिणाम कसा  होतो?

नासाच्या शास्त्रज्ञांच्या अनुसार ग्रहणामुळे कोणतेही आजारपण उद्भवत नाही. शारीरिक किंवा मानसीक स्थितीवर कोणताही नकारात्मक परीणाम उद्भवत नाही.


चंद्र ग्रहण पाहिल्याने काय होते?

चंद्रग्रहणाच्यावेळी  सूर्याची किरणं चंद्रावर पडत नसल्यामुळे या ग्रहणाला उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास कोणताही वाईट परीणाम होत नाही. चंद्रग्रहण तुम्ही पाहीले तरी चालू शकतं. यावेळी सूर्यग्रहणाच्यावेळी सूर्य उघडया डोळ्यांनी पाहणे आरोग्यासाठी धोकादायक असते.  पण चंद्र ग्रहणाच्यावेळी  सूर्याचा प्रकाश नसतो तसंच त्याचा प्रकाश नसल्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. 

Web Title: Wolf moon eclipse 2020: Reason of tsunami every fact about Chandra grahan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.