24 वर्षीय बॉयफ्रेंडपासून वय लपवण्यासाठी 41 वर्षीय महिलेने केलं असं काही, स्वत:च फसली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:54 PM2023-12-05T12:54:04+5:302023-12-05T12:54:28+5:30
महिलेचा जन्म 1982 मध्ये झाला होता. तिच्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्यांना पासपोर्टमध्ये काहीतरी गडबड दिसली.
जगभरातून अफेअरच्या अनेक अजब घटना समोर येत असतात. कपलच्या वयाच्या अंतराबाबत तर दररोज काहीना काही हैराण करणारं समोर येत असतं. एक महिला तिच्या बॉयफ्रेंडपेक्षा 17 वर्षाने मोठी आहे. तिचं वय 41 तर बॉयफ्रेंडचं वय 24 वर्षे आहे. तिने बॉयफ्रेंडपासून आपलं वय लपवण्यासाठी असं काही केलं की, ती स्वत: फसली. महिलेला तिच वय लपवायचं होतं म्हणून तिने नकली पासपोर्ट बनवण्याचा आधार घेतला. ही घटना चीनच्या बीजिंगमधील आहे. महिलेचा जन्म 1982 मध्ये झाला होता. तिच्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्यांना पासपोर्टमध्ये काहीतरी गडबड दिसली. जेव्हा महिलेची कागदपत्रे चेक केली जात होती तेव्हा ती घाबरली होती.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, तिने तिचा पासपोर्ट मागे खेचला जेणेकरून अधिकारी तो चेक करू नये. ती अधिकाऱ्याला म्हणाली की, बाजूला येऊन बोलू. तर बॉयफ्रेंडला म्हणाला म्हणाली की, चेक पॉइंटकडे जा. पुढे चौकशीतून समोर आलं की, तिच्याकडे वेगवेगळ्या जन्मतारखेचे दोन चीनी पासपोर्ट आहेत. अधिकाऱ्यांना समजलं की, यातील एक पासपोर्ट नकली आहे. यात खाजगीमध्ये बदल करण्यात आला आहे. यानंतर महिलेने मान्य केलं की, तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशन कायम ठेवण्यासाठी आपलं खरं वय लपवलं.
या महिलेला भिती होती की, तिचं खरं वय माहीत पडल्यावर तिचं रिलेशनशिप संपेल. तिने जपानला जाण्यासाठी एक नकली पासपोर्ट बनवला. ज्यात जन्मतारीख 1996 टाकली होती. यासाठी तिने 6500 युआन म्हणजे 77 हजार रूपये खर्च केला. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी जेव्हा महिलेची चौकशी केली तेव्हा ती रागाने म्हणाली की, तिने केवळ तिची जन्मतारीख बदलली आहे.
यासाठी या महिलेला 3 हजार युआन म्हणजे 35 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. तिचा नकली पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिलं की, जर यांच्यात खरं प्रेम असेल तर वय महत्वाचं ठरत नाही. पण खरंच यावरून हे समजून येतं की, ती दिसायला मोठी दिसत नाही, ती कशी वय लपवते?