लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीला म्हणाला किन्नर, मेहुणीवर होता डोळा; पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 03:36 PM2024-05-28T15:36:52+5:302024-05-28T15:44:45+5:30

एक हैराण करणारी घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून समोर आली आहे. निकाह झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीने पत्नीला किन्नर ठरवलं. 

Woman accused on husband that he called her at marriage first night kinnar | लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीला म्हणाला किन्नर, मेहुणीवर होता डोळा; पोलिसात तक्रार

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीला म्हणाला किन्नर, मेहुणीवर होता डोळा; पोलिसात तक्रार

लग्नातील किंवा लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या किंवा घटस्फोटाच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. कधी कधी तर अशा घटना असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. अशीच एक हैराण करणारी घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून समोर आली आहे. निकाह झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीने पत्नीला किन्नर ठरवलं. 

महिलेचा आरोप आहे की, पती पत्नीला म्हणाला की, तुझी बहीण खूप सुंदर आहे. त्याने तिच्यासोबत छेडछाडही सुरू केली आहे. माहेरच्या लोकांनी मुलीची मेडिकल टेस्टही केली. ज्यातून ती महिलाच असल्याचं स्पष्ट झालं. तरीही पतीने ऐकलं नाही. त्याने पत्नीला दोन लाख रूपये हुंडा आणण्यासाठीही सांगितलं. पत्नीने हुंडा आणला नाही म्हणून त्याने तिला तीन तलाक म्हणत घराबाहेर काढलं. आता पोलिसांनी दोन्हीकडील लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आहे.

ही घटना इज्‍जतनगरच्या एका गावातील आहे. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, गेल्या 19 मे रोजी तिचा निकाह झाला होता. पहिल्याच रात्री पतीने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. पती पत्नीला लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणाला की, तू संर्पूण महिला नाहीये. मी तुझ्यासोबत राहणार नाही. महिलेची बहिणही सोबत आली होती. पतीने मेहुणीसोबत अश्लील चाळेही सुरू केले. पती म्हणाला की, तुझ्या माहेरच्या लोकांनी हुंडा कमी दिलाय. जास्त हुंडा घेऊन येशील तरच घरात राहू देणार.

महिलेच्या तक्रारीवरून इज्जतनगर पोलीस स्टेशनने चौकशी सुरू केली आहे. महिलेने आपल्या तक्रारीत असाही आरोप केला की, पती आणि सासरच्या लोकांना तिच्या सर्व वस्तूही घेऊन घेतल्या. पोलिसांनी आता दोन्हीकडील लोकांना स्टेशनमध्ये बोलवलं आहे जेणेकरून यातून समाधान काढता येईल.

Web Title: Woman accused on husband that he called her at marriage first night kinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.