बोंबला! गेल्या १५ वर्षात तिने ७ लाख रूपयांची पावडर खाल्ली, दिवसाला पावडरचा एक अख्खा डबा करते फस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 09:39 AM2020-01-08T09:39:33+5:302020-01-08T10:08:51+5:30

जगभरातील लोकांना वेगवेगळ्या सवयी असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले आणि वाचले असेल. पण त्याहूनही एक वेगळी सवय असलेली एक महिला समोर आली आहे.

This woman is addicted to eating talcum power says has spent 7 5 lakh on it in 15 years | बोंबला! गेल्या १५ वर्षात तिने ७ लाख रूपयांची पावडर खाल्ली, दिवसाला पावडरचा एक अख्खा डबा करते फस्त!

बोंबला! गेल्या १५ वर्षात तिने ७ लाख रूपयांची पावडर खाल्ली, दिवसाला पावडरचा एक अख्खा डबा करते फस्त!

Next

जगभरातील लोकांना वेगवेगळ्या सवयी असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले आणि वाचले असेल. पण त्याहूनही एक वेगळी सवय असलेली एक महिला समोर आली आहे. लीसा एंडरसन नावाच्या या महिलेने अजब खुलासा केला आहे. लीसा टॅल्कम पावडर म्हणजेच तोंडाला लावण्याचं पावडर खाण्याची सवय आहे. ती एका दिवसात पावडरचा एक पूर्ण २०० ग्रॅमचा डबा खाते.

लीसाचं वय ४४ वर्षे असून ती एक आई सुद्धा आहे. ती सांगते की,  तिला ही सवय १५ वर्षांपूर्वी लागली होती. एक दिवस ती तिच्या बाळाची आंघोळ करून देत होती, यादरम्यानच तिला जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन बेबी पावडर खाण्याची इच्छा झाली. तेव्हापासूनच तिला ही सवय लागली.

लीसा ही पाच मुलांची आई आहे. ती दर अर्ध्या तासाने हातावर पावडर घेते आणि खाते. इतकेच नाही तर अनेकदा ती झोपेतून उठूनही ती पावडर खाते. लीसा सांगते की, तिने गेल्या १५ वर्षात ८ पाउंड म्हणजेच ७.५ लाख रूपयांपेक्षा अधिक किंमतीची पावडर खाल्ली आहे.

ती सांगते की, गेल्या १५ वर्षात एकदाही असं नाही झालं की, ती दोन दिवसांपेक्षा अधिक विना पावडर खाल्ल्याने राहिले असेल. तिने तिची ही अजब सवय जगापासून लपवून ठेवली. इतकेच काय तर तिने तिच्या एक्स पतीला देखील याबाबत काही सांगितलं नाही. 

लीसाला आता तिची ही विचित्र सवय सोडायची आहे. त्यासाठी तिने तज्ज्ञांना संपर्क देखील केला आहे. डॉक्टरांनी तिला सांगितले की, ती पिका सिंड्रोमने पीडित असू शकते. यात लोकांना अशा गोष्टी खाण्याची इच्छा होते, ज्या खाण्यासाठी नसतात. अनेक लोक माती किंवा पेंटही खातात.

 


Web Title: This woman is addicted to eating talcum power says has spent 7 5 lakh on it in 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.