कुटुंब वाढवण्यासाठी दत्तक घेतलं मुलं, डीएनए टेस्ट करताच सरकली पायाखालची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 04:25 PM2022-04-17T16:25:42+5:302022-04-17T16:29:09+5:30

जेव्हा नात्यात खोटेपणा आणि धोका येतो तेव्हा गोष्टी वेगळ्याच वळणावर पोहोचतात आणि आणखी गुंतागुंतीच्या होतात. अलीकडेच एका महिलेसोबतही असाच प्रकार घडला, जेव्हा तिला तिच्या पतीने तिच्यापासून लपवलेलं एक मोठं रहस्य कळालं.

woman adopts baby of her husband from different woman find out after DNA test | कुटुंब वाढवण्यासाठी दत्तक घेतलं मुलं, डीएनए टेस्ट करताच सरकली पायाखालची जमीन

कुटुंब वाढवण्यासाठी दत्तक घेतलं मुलं, डीएनए टेस्ट करताच सरकली पायाखालची जमीन

Next

अनेकदा नातेसंबंधात दुरावा येतो मात्र कपल या सगळ्या गोष्टी आपसात बोलून सोडवतात आणि पुढे जातात. मात्र, जेव्हा नात्यात खोटेपणा आणि धोका येतो तेव्हा गोष्टी वेगळ्याच वळणावर पोहोचतात आणि आणखी गुंतागुंतीच्या होतात. अलीकडेच एका महिलेसोबतही असाच प्रकार घडला, जेव्हा तिला तिच्या पतीने तिच्यापासून लपवलेलं एक मोठं रहस्य कळालं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडिया साइट रेडिटवर एका महिलेनं तिच्या आणि तिच्या पतीशी संबंधित एका धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं. महिलेनं सांगितलं की ती ४१ वर्षांची आहे आणि तिला नेहमीच मोठं कुटुंब हवं होते. तिला आधीच 3 मुली आणि 1 मुलगा होता. असं असूनही तिला आपलं कुटुंब आणखी वाढवायचं होतं, पण तिचं शरीर साथ देत नव्हतं. याचं तिला दु:ख होतं, मात्र कुटुंब वाढवण्याचा तिचा निर्णय ठाम होता. त्यामुळे तिने बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला (Couple Adopted Boy).

त्यादरम्यान महिलेचा ४८ वर्षांचा पती डेव्ह दुसऱ्या देशात काम करत होता. डेव्ह परत आल्यावर आपण त्याच्यासोबत याबाबत बोलू असं महिलेला वाटलं. हे ऐकून डेव्हला आनंद झाला, परंतु त्याने आंतरराष्ट्रीय दत्तक प्रक्रियेचं अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आणि महिलेनंही ही गोष्ट मान्य केली. डेव्ह ज्या देशात काम करत होता त्याच देशातील मुलाला दोघांनी दत्तक घेतलं. दत्तक घेण्याची संपूर्ण प्रक्रिया, सर्व कागदपत्र यांची पूर्तता डेव्हने केली.

हा मुलगा जसजसा मोठा व्हायला लागला तसतसं सगळे म्हणायचे की तो या पती-पत्नीच्या इतर मुलांसारखाच दिसतो. तो दत्तक घेतल्यासारखच वाटतच नसल्याचं लोक बोलायचे. महिलाही या गोष्टीमुळे हैराण होती, पण डेव्ह हे सर्व मस्करीत घ्यायचा आणि हसायचा. एकदा महिला खोली साफ करत असताना तिला मुलाचं दत्तक घेतानाचं कागदपत्र सापडलं. तोपर्यंत मुलगा ७ वर्षांचा झाला होता. महिलेला कागदपत्रांमध्ये काहीतरी गडबड आढळून आली आणि त्यानंतर तिने मुलाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

डीएनए चाचणीचा अहवाल समोर आल्यावर महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. कारण दाम्पत्याने दत्तक घेतलेल्या मुलाचे खरे वडील हे महिलेचा पती म्हणजेच डेव्ह होते (Woman Found Adopted Boy Biological Son of Husband). दोघांचे डीएनए मॅच झाले. मग डेव्हने कबूल केलं की त्याचं दुस-या देशातील एका महिलेशी प्रेमसंबंध होते, परंतु त्या महिलेला ते मुल होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे डेव्हने हा मुलगा आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला.

हे ऐकून महिलेला धक्काच बसला. तिने या मुलाचा तिथून पुढेही आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, डेव्हकडे घटस्फोटाची मागणी केली. जेव्हा तिने रेडिटवर याबद्दल लोकांचं मत विचारलं तेव्हा सर्वांनी तिचं समर्थन केलं आणि सांगितलं की ही एक मोठी फसवणूक आहे आणि त्यासाठी कोणतीही माफी नाही. महिलेनं पतीला घटस्फोट द्यावा, असाच सल्ला अनेकांनी दिला.

 

 

Web Title: woman adopts baby of her husband from different woman find out after DNA test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.