आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 02:18 PM2020-12-31T14:18:48+5:302020-12-31T14:21:01+5:30

टिकटॉकवर चांगलीच लोकप्रिय असलेल्या या महिलेने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

A woman in America conceives a baby few days after getting pregnant with twins | आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...

आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...

Next

अमेरिकेतील एका महिलेसोबत घडलेली एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. झालं असं की, जुळ्या मुलांची गर्भधारणा झाल्यानंतर एका आठवड्यातच तिला समजले की, ती पुन्हा प्रेग्नेंट झाली आहे. म्हणजे तिने तिसरं बाळही कन्सीव केलं आहे. टिकटॉकवर चांगलीच लोकप्रिय असलेल्या या महिलेने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या महिलेने तिच्या व्हिडीओत सांगितले की, ही सुपर फिटिशनची केस आहे. २०१६ मध्ये एका रिपोर्टनुसार, सुपर फिटिशनच्या फार कमी केसेस समोर आल्या आहेत. या केसेसप्रमाणेच ही महिला काही दिवसांच्या फरकाने दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिली. ही महिला म्हणाली की, मी माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीमधेच जॅकपॉट मिळवलाय. एकत्र तीन बाळ येत आहेत. त्यामुळे अशीही शक्यता वाढली आहे की, ही माझी पहिली आणि अखेरची प्रेग्नेन्सी असेल. 

टिकटॉकवर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये महिलेने सांगितले की, 'माझं तिसरं बाळ आधीच्या दोन बाळांपेक्षा १० किंवा ११ दिवसांनी लहान आहे. यातून हे स्पष्ट झालं होतं की, ही माझी सेकंड प्रेग्नन्सी होणार आहे. मुलं कुपोषित तर नाही आणि हे खरंच सुपर फिटिशन आहे. हे कन्फर्म करण्यासाठी डॉक्टर दर दोन आठवड्यांनी माझं अल्ट्रास्कॅन  करत आहेत'.

ती म्हणाली की, 'हे बाल हेल्दी रेटवर ग्रो करत आहे आणि सर्वच ठीक आहे'. या महिलेच्या व्हिडीओला टिकटॉकवर ५० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. टिकटॉकवर ब्लॉन्ड बनी असं नाव वापरणारी ही महिला तिच्या बाळांबाबत सतत अपडेट देत असते. 

आपल्या तिसऱ्या बेबीच्या सरप्राइजनंतर टिकटॉक स्टार आई बनण्यासाठी आणखी जास्त उत्साही आहे. ती म्हणाली की, 'आपल्याला पेरेंट्स व्हायचं असतं आणि आम्ही नशीबवान आहोत की, एकत्र तीन मुले आमच्या आयुष्यात येणार आहे. मी थोडी नर्वस आहे'.
 

Web Title: A woman in America conceives a baby few days after getting pregnant with twins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.