प्रियकरासाठी पतीला सोडू का? पत्नीनं ChatGPT विचारला प्रश्न अन् आश्चर्यकारक उत्तर मिळालं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:00 PM2023-01-19T18:00:49+5:302023-01-19T18:02:01+5:30

Woman Asked Question From ChatGPT: एका विवाहित महिलेचं दुसऱ्या एका पुरुषावर प्रेम जडलं. सहा महिने अफेअरमध्ये राहिल्यानंतर आता प्रियकरासोबत राहावं की पतीसोबतच राहावं या संभ्रमात ती पडली होती.

woman asked chatgpt should i leave husband for lover know what ai replied | प्रियकरासाठी पतीला सोडू का? पत्नीनं ChatGPT विचारला प्रश्न अन् आश्चर्यकारक उत्तर मिळालं...

प्रियकरासाठी पतीला सोडू का? पत्नीनं ChatGPT विचारला प्रश्न अन् आश्चर्यकारक उत्तर मिळालं...

Next

Woman Asked Question From ChatGPT: एका विवाहित महिलेचं दुसऱ्या एका पुरुषावर प्रेम जडलं. सहा महिने अफेअरमध्ये राहिल्यानंतर आता प्रियकरासोबत राहावं की पतीसोबतच राहावं या संभ्रमात ती पडली होती. आता याचं उत्तर मिळवण्यासाठी महिलेनं चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅपची मदत घेतली. तिने ChatGPT ला विचारलं - मी माझ्या प्रियकरासाठी माझ्या पतीला सोडू का? यावर AI ने दिलेले उत्तर जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेंससाठी ChatGPT ची जोरदार चर्चा आहे. हा असा चॅटबॉट आहे, ज्यानं लोकांच्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्यानं मनं जिंकली आहेत. यामुळेच चॅटजीपीटी लवकरच इंटरनेट यूझर्समध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. यातच जेव्हा ३७ वर्षीय सारा नावाच्या विवाहित महिलेनं ChatGPT ला विचारलं की तिने तिच्या प्रियकरासाठी आपलं ५ वर्षांचं लग्न मोडायचं का? यावर चॅटबॉटने दिलेले उत्तर लक्षवेधी ठरलं. 

टेक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या साराच्या म्हणण्यानुसार, ती विवाहित लोकांसाठी डेटिंग अॅप वापरत होती. त्यावर तिची एका व्यक्तीशी मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. गेल्या सहा महिन्यांपासून तिचं या  पुरुषासोबत अफेअर होतं. ती सांगते की तिला ChatGPT बद्दल माहिती होती. मग तिनं विचार केला की चॅटबॉटच्या मदतीनंच आपण आपला गोंधळ का दूर करू नये. मग तिनं चॅटबॉटला तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला.

...आणि तिनं पतीला सोडण्याचा घेतला निर्णय
मिररच्या रिपोर्टनुसार, साराने चॅटबॉटला विचारलं की- आपलं अयशस्वी लग्न सोडून आपल्यावर प्रेम करणाऱ्यासोबत जीवन जगण्याला प्राधान्य द्यावं का? महिलेचं म्हणणं आहे की तिने अॅपला आपल्या आयुष्यातील सद्य परिस्थितीवर कथा लिहिण्यास सांगितलं होतं. साराच्या मते, तिचा अनुभव आश्चर्यकारक होता. ती म्हणते की माझ्या समस्यांबद्दल बोलण्याबरोबरच चॅटजीपीटीने तिच्या आनंदाचाही विचार केला. चॅटबॉटनं तिला उत्तर दिलं की आपण आपल्या आनंदाला प्राधान्य द्यायला हवं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साराने चॅटबॉटचा सल्ला स्वीकारला आणि आपल्या पतीला घटस्फोट दिला.

Web Title: woman asked chatgpt should i leave husband for lover know what ai replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.