२० वर्षानंतर महिलेने एक्स बॉयफ्रेन्डला पाठवला मेसेज, विचारलं - पिता बनणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 06:30 PM2022-05-16T18:30:32+5:302022-05-16T18:31:09+5:30

Relationship : ४५ वर्षीय रेनी न्यूझीलॅंडमध्ये राहणारी आहे. साधारण ५ वर्षाआधी तिचं लग्न मोडलं होतं. पण आता तिला एका बाळाला जन्म द्यायची इच्छा आहे.

Woman asked ex for sperm donation after having no contact for 20 years | २० वर्षानंतर महिलेने एक्स बॉयफ्रेन्डला पाठवला मेसेज, विचारलं - पिता बनणार का?

२० वर्षानंतर महिलेने एक्स बॉयफ्रेन्डला पाठवला मेसेज, विचारलं - पिता बनणार का?

googlenewsNext

Relationship : एका महिलेने साधारण २० वर्षानंतर तिच्या एका एक्स बॉयफ्रेन्डला संपर्क केला आणि त्याला एका आश्वासनाची आठवण करून दिली. एक्स बॉयफ्रेन्डने जे उत्तर दिलं ते ऐकून महिलाही हैराण झाली. या महिलेने स्वत: तिची कहाणी शेअर केली. जी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

४५ वर्षीय रेनी न्यूझीलॅंडमध्ये राहणारी आहे. साधारण ५ वर्षाआधी तिचं लग्न मोडलं होतं. पण आता तिला एका बाळाला जन्म द्यायची इच्छा आहे. यासाठी रेनी तिच्या एका एक्स बॉयफ्रेन्डला मदत मागण्याचा विचार केला. यानंतर एक्स बॉयफ्रेन्डने जे उत्तर दिलं, रेनी ते ऐकून हैराण झाली.

रेनीने तिच्या एक्सला २० वर्षांनंतर कॉन्टॅक्ट केला होता. रेनीने सांगितलं की, तिने २० वर्षांनंतर तिच्या बॉयफ्रेन्डला एक आश्वासन आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होती आणि विचारलं की, तो पिता बनण्यासाठी स्पर्म डोनेशन करणार का? तिने News.com.au सोबत बोलताना सांगितलं की, मी माझ्या एक्सला २० वर्षांची असताना भेटले होते. तेव्हा मी लंडनमध्ये राहत होती.

लंडनमध्येच तिची भेट डॅमियनसोबत झालं. रेनीने सांगितलं की, दोन वर्ष आम्ही खूप आनंदाने एकमेकांसोबत होतो. पण फ्यूचर प्लान्समुळे आम्हाला वेगळं व्हावं लागलं होतं.

रेनीने सांगितलं की, मी न्यूझीलॅंडला राहते आणि मी नेहमीसाठी लंडनला शिफ्ट होऊ शकत नव्हते. नंतर आमचं ब्रेकअप झालं. पण त्यानंतरही ते दोघे एकमेकांपासून दूर झाले नाही. रेनीला पीरियड्समधील वेदनांवर उपचार घ्यायचे होते तेव्हा ती डॅमियनला सोबत घेऊन गेली. ती म्हणाली की, ती Endometriosis नावाच्या आजाराने ग्रस्त होती. ज्यामुळे ती आई होऊ शकत नव्हती.

रेनीने सांगितलं की, त्यावेळी डॅमियन तिच्यासोबत होता. त्या दोघांचं रिलेशनशिप संपणार होतं. तरीही डॅमियनने तिला आई होण्यास मदत करण्याची ऑफर दिली. रेनी म्हणाली की, काही आठवड्यांनंतर मी तिथे परत आले. पण मी त्याचं बोलणं आपल्या मनात साठवून होते. वर्ष उलटत गेली, पण डॅमियन कधीही माझ्या मनातून गेला नाही.

रेनी आणि डॅमियनने वेगवेगळ्या पार्टनरसोबत लग्न केलं. डॅमियनला मुलंही आहेत. पण रेनीचं लग्न २०१५ मध्ये मोडलं. तेव्हा ती ४० वर्षांची झाली होती. मुलांना जन्म देण्याचा तिला काही पर्यायच दिसत नव्हता. पण ती आई बनण्याचा प्रयत्न करत होती. आधी तिने स्पर्म बॅंकचा रिसर्च केला. पण ते तिच्यासाठी महागडं ठरत होतं. तेव्हा रेनीला डॅमियनचं आश्वासन आठवलं. तिने डमियनला मेसेज केला की, तू काही वर्षाआधी दिलेलं आश्वासन आठवतं का?

फोनवर चॅटिंग दरम्यान डॅमियनने सांगितलं की, तो पुन्हा सिंगल झाला आहे आणि तो रेनीच्या मदतीसाठी तयार आहे. डॅमियनने रेनीला सांगितलं की, मी पुढील ९ महिने तुझ्यासोबत राहणार आणि माझी इच्छा आहे की, तू पुन्हा माझ्यावर प्रेम करावं.

IVF च्या यशस्वी उपचारानंतर जेव्हा रेनी १२ आठवड्यांची प्रेग्नें झाली होती. तेव्हा दोघे सोबत राहू लागले. याच्या एक महिन्यानंतरच डमियनने तिला प्रपोज केलं. रेनी म्हणाली की, स्पर्म डोनर करणारी व्यक्ती माझा पती झाला. जुलै २०१८ मध्ये मी एका सुंदर मुलीला जन्म दिला.
 

Web Title: Woman asked ex for sperm donation after having no contact for 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.