रेल्वेखाली जीव द्यायला गेली, ड्रायव्हरने वाचवला जीव; प्रेमातही पडली महिला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 03:42 PM2024-11-02T15:42:20+5:302024-11-02T15:43:20+5:30
ही महिला जीवनाला कंटाळून रेल्वेखाली जीव द्यायला गेली होती. तेव्हाच रेल्वेच्या ड्रायव्हरने तिचा जीव वाचवला.
जीवनात कुणासोबत कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. प्रेमाचंही तसंच आहे. ते कधी कुणावर जडेल हे सांगता येत नाही. प्रेमात ना वय बघितलं जातं ना जात-धर्म. प्रेमाच्या अनेक अनोख्या कहाण्या नेहमीच समोर येत असतात. अशीच एक कहाणी ब्रिटनमधील एका महिलेची आहे. ही महिला जीवनाला कंटाळून रेल्वेखाली जीव द्यायला गेली होती. तेव्हाच रेल्वेच्या ड्रायव्हरने तिचा जीव वाचवला. इतकंच नाही तर पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नही केलं.
'डेली स्टार'च्या एका रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या वेस्ट यॉर्क्सच्या ब्रॅडफोर्डमध्ये राहणारी ३३ वर्षीय शार्लेट दोन मुलांची आई आहे आणि नर्स आहे. मात्र, ती डिप्रेशनची शिकार झाली होती. अशात २०१९ मध्ये तिने निर्णय घेतला की, ती जीवन संपवेल. त्यामुळे आत्महत्या करण्यासाठी ती रेल्वेच्या ट्रॅकवर गेली. ती रेल्वेची वाट बघत उभी होती. एक रेल्वे दुरून येत होती. या रेल्वेच्या लोको पायलटने म्हणजे ड्रायव्हरने महिलेला ट्रॅकवर पाहिलं आणि त्याने इमरजन्सी ब्रेक लावत रेल्वे तिच्या आधीच रोखली.
ड्रायव्हरने वाचवला जीव
ड्रायव्हर खाली उतरून महिलेजवळ गेला. साधारण अर्धा तास तोस तिच्यासोबत बोलत होता. त्याने तिला जीवनाचं महत्व समजावून सांगितलं. शार्लेटला सुद्धा त्याचं बोलणं समजलं. ड्रायव्हरने तिला जवळच्या रेल्वे स्टेशनला पाठवलं आणि नंतर स्टेशन मास्तर व पोलिसांनी तिला मेंटल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये पाठवलं. शार्लेटला ही व्यक्ती इतकी आवडली की, तिने त्याचा फेसबुकवर शोध घेतला. त्याचं नाव डेव ले होतं. तिने मेसेज करून त्याचे आभार मानले. डेव सुद्धा तिला म्हणाला की, कधीही बोलायचं असेल तर फोन कर. दोन महिने दोघांची चॅटींग केलं आणि त्यानंतर कॉफी पिण्यासाठी भेटण्याचं ठरवलं.
दोघांनी गेलं लग्न
हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ३ वर्षांनी दोघांनी लग्न केलं. त्यावेळी शार्लेट २२ आठवड्यांची गर्भवती होती. आता ती मुलांची आई आहे आणि डेववर तिचं खूप प्रेम आहे. शार्लेटला जाणीव झाली आहे की, जीवन सुंदर आणि ते असंच संपवू नये. शार्लेटने आत्महत्येचा विचार केला तेव्हा ती वेगवेगळ्या मानसिक समस्या होत्या. त्यात डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, एंक्झायटी, पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर, इमोशनली अनस्टेबल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची यांचा समावेश आहे. ती आयुष्याला कंटाळली होती आणि म्हणून तिला जीवन संपवायचं होतं.