दगा देणाऱ्या बॉयफ्रेंडला शिकवला तिने असा धडा, सरकारकडून मिळाले 83 लाख रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:25 PM2024-01-06T13:25:12+5:302024-01-06T13:53:52+5:30
आवाने सांगितलं की, रिलेशनशिपमध्ये असताना तिच्या बॉयफ्रेंडने एकदा तिला त्याने केलेल्या टॅक्स चोरीबाबत सांगितलं होतं.
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा पती-पत्नीने एकमेकांसोबत दगा केलेल्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. अशात दगा मिळालेले लोक एकतर देवदास बनतात नाही तर सूड घेण्याचा विचार करतात. Ava Louise ने असंच काहीसं केलं. तिने तिच्या दगा देणाऱ्या बॉयफ्रेंडचा असा सूड घेतला की, सगळे हैराण झाले. तिने त्याच्यासोबत जे केलं ते टिकटॉकवर सांगितलं.
आवाने सांगितलं की, रिलेशनशिपमध्ये असताना तिच्या बॉयफ्रेंडने एकदा तिला त्याने केलेल्या टॅक्स चोरीबाबत सांगितलं होतं. जे तिला लक्षात होतं. अशात त्याने तिला दगा दिल्यानंतर आवाने याच्याच आधारे त्याच्या सूड घेण्याचा प्लान केला. तिने यूएस इंटरनल रेव्हेन्यू सर्विसमध्ये त्याची तक्रार केली. झालं असं की, पोलिसांनी छापा टाकून तिच्या बॉयफ्रेंडला पकडलं आता टॅक्स चोरी प्रकरणी त्याची चौकशी केली जात आहे आणि त्याला तुरूंगवासही होऊ शकतो.
हे करून आवाला आनंद तर झाला सोबतच तिचा आनंद डबल तेव्हा झाला जेव्हा तिला तक्रार करण्यासाठी सरकारकडून 83 लाख रूपयाचा व्हिसलब्लोअर अवार्डही देण्यात आला. व्हिडिओत तिने सांगितलं की, ती हा पैसा कसा खर्च करणार आहे.
कधी दिला जातो हा अवार्ड
यूएसमध्ये आयआरएस व्हिसलब्लोअर ऑफिस अशा लोकांना फायनॅन्शिअल इंसेंटिव देतं जे कुणाच्या गैरप्रकाराच्या तक्रारी करतात. यासाठी अट ही आहे की, रिपोर्ट करण्यात आलेली टॅक्स चोरी 2 मिलियन डॉलरपेक्षा जास्त असावी आणि आरोपीचं वार्षिक उत्पन्न कमीत कमी 200,000 डॉलरपेक्षा जास्त असावं.