चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यासाठी महिलेने लढवली शक्कल, केले गरोदरपणाचे नाटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 09:26 PM2017-12-02T21:26:51+5:302017-12-02T21:56:51+5:30

चित्रपटगृहात मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमती जास्त असल्याने तिने घरून खाद्यपदार्थ नेण्यासाठी अशी व्यवस्था केली.

woman brought food in stomach as pregnant woman in movie theatre | चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यासाठी महिलेने लढवली शक्कल, केले गरोदरपणाचे नाटक

चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यासाठी महिलेने लढवली शक्कल, केले गरोदरपणाचे नाटक

Next
ठळक मुद्देचित्रपटगृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसते आणि इंटरव्हल दरम्यान जे पॉपकॉर्न येतात त्यांची किंमत फार असते. एंजल यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर करताच अनेकांनी त्यांच्या या युक्तीचं अभिनंदन केलं.तिच्याकडे काहीतरी घातक किंवा स्फोटक असण्याची शक्यता होती किंवा तिने कसलीतरी तस्करी केल्याचीही शक्यता होती.

ऑस्ट्रेलिया - चित्रपट पहायला गेलेल्या एका गरोदर महिलेला पोलिसांनी तिच्या संशायास्पद हालचालींसाठी अटक केली. तिच्याकडे काहीतरी स्मगलिंगच्या वस्तु असल्याचा संशय पोलिसांना आला. पण तिची अधिक चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली. हा प्रकार ऑस्ट्रेलियातल्या एका शहरात घडला आहे. 

आपलं आवडतं स्नॅक्स चित्रपटगृहात घेऊन जाता यावं याकरता एंजेला ब्रिस्क या तरुणीने एक नामी शक्कल लढवली. चित्रपटगृहात जाताना या महिलेनं आपल्या पोटात एक गोलाकार बाऊल ठेवला. या बाऊलच्या आतमध्ये तिने तिचे आवडते पॉपकॉर्न टाकले होते. पोटात बाऊल ठेवल्याने ती महिला गरोदर असल्याचं पाहता क्षणी वाटलं. पण पोलिसांना या महिलेचा संशय आला. म्हणून त्यांनी तिला अटक केली. तिच्याकडे काहीतरी घातक किंवा स्फोटक असण्याची शक्यता होती किंवा तिने कसलीतरी तस्करी केल्याचीही शक्यता होती. तिच्या हालचालींवरून पोलिसांना संशय येताच तिला अटक केली. तपासाअंती तिच्या पोटात बाऊल असून त्या बाऊलमध्ये पॉपकॉर्न असल्याचं स्पष्ट झालं आणि सगळ्यांचा एकच हशा झाला. 

बरं ही माहिती खुद्द त्या महिलेनेच ट्विटवर शेअर केली आहे. चित्रपटगृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसते आणि इंटरव्हल दरम्यान जे पॉपकॉर्न येतात त्यांची किंमत फार असते. त्यामुळे पॉपकॉर्न खात चित्रपटाचा आनंद लुटायचा असेल तर हा काहीतरी नामी शक्कल करायला हवी याकरता या महिलेने गरदोरपणाची युक्ती लढवली.एंजल यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर करताच अनेकांनी त्यांच्या या युक्तीचं अभिनंदन केलं. चित्रपटगृहातले पॉपकॉर्न फार महाग असतात त्यामुळे ते परवडत नाहीत आणि बाहेरचे खाद्यपदार्थ आत नेण्यास परवानगी नसते,  त्यामुळे ही युक्ती नक्कीच उपयोगाला येईल असं काही जणांनी म्हटलं आहे.


तर पुरुषांनीही यावर हास्यकल्लोळ माजवलाय. एंजेला यांनी लढवलेली कल्पना महिलांसाठी योग्य आहे, मग पुरुषांनी काय करायचं? अशा वेळेस एका इसमाने एका पोट बाहेर आलेल्या इसमाचा फोटो शेअर करून पुरुषही ही युक्ती लढवू शकतो असं म्हटलं आहे. अर्थात अशी युक्ती आखण्याआधी थोडीशी सावधानता बाळगायला हवी नाहीतर एंजेला यांना ज्याप्रकारे संशास्परित्या पकडलं तसंच आपल्याही पकडण्यात येईल असंही काही नेटीझन्सने म्हटलं आहे. 


आणखी वाचा - चित्रपटात वापरलेले कपडे आणि वस्तु नंतर कुठे जातात ?

Web Title: woman brought food in stomach as pregnant woman in movie theatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.