प्यारवाली लव्हस्टोरी! "तो मला राणीसारखं ठेवतो"; 20 वर्षांनी मोठ्या बॉसच्या प्रेमात पडली तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:49 PM2022-11-28T15:49:20+5:302022-11-28T16:23:40+5:30

एक तरुणी आपल्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या बॉसच्या प्रेमात पडली आहे. यानंतर दोघांनी लग्न केलं.

woman called mad for dating boss 20 years older than her but they are married and in love age gap relationship | प्यारवाली लव्हस्टोरी! "तो मला राणीसारखं ठेवतो"; 20 वर्षांनी मोठ्या बॉसच्या प्रेमात पडली तरुणी

फोटो - आजतक

Next

कोण कधी कोणाच्या कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक तरुणी आपल्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या बॉसच्या प्रेमात पडली आहे. यानंतर दोघांनी लग्न केलं. त्यावेळी ती 24 वर्षांची होती. तर बॉस 44 वर्षांचा होता. 44 वर्षीय व्यक्तीने तिला घरातील काम करायला ठेवलं होतं. पण याच दरम्यान ते एकमेकांना डेट करायला लागले. वयात मोठं अंतर असल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली. 

क्रिस्टल न्यूयॉर्कमध्ये परत शिफ्ट झाली. तेव्हा तिने नॅनीच्या जॉबसाठी जाहिरात पाहिली आणि त्यासाठी अप्लाय केलं. जॉब पक्का होताच बेन क्रिस्टलचा बॉस झाला. वयामध्ये 20 वर्षांचं अंतर असूनही या कपलच लाईफ एकदम शानदार आहे. क्रिस्टल सावत्र मुलांसोबत अगदी प्रेमाने मिळून मिसळून राहते. तिची मुलं तिच्यापेक्षा फक्त काही वर्षांनीच छोटा आहे. तसेच क्रिस्टलने पती तिला राणीसारखा ठेवतो असंही म्हटलं आहे. 

टिकटॉकवर एक व्हि़डीओ टाकून क्रिस्टलने सांगितलं की, मला पार्ट टाईम नॅनीच्या कामासाठी हायर केलं होतं. पण आता मी फुल टाईम वाइफ झाली. आता क्रिस्टल 30 वर्षांची असून पती बेन 50 वर्षांचा आहे. क्रिस्टलने लोक तिला वेडी म्हणायचे. कारण तिने 20 वर्षांनी मोठ्या बॉसला डेटला करण्याची इच्छा जाहीर केली होती. पण तिने लोकांकडे दुर्लक्ष केलं आणि आता ते आनंदात राहत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: woman called mad for dating boss 20 years older than her but they are married and in love age gap relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.