एका जाहिरातीमुळे बदललं महिलेचं आयुष्य, समोर आलं पतीचं धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 12:47 PM2021-08-05T12:47:04+5:302021-08-05T12:49:24+5:30
टिकटॉकवर एका महिलेने आपल्या फॉलोअर्सला विचारलं होतं की, तिला तिच्या पतीच्या अफेअरबाबत कधी आणि कसं समजलं.
अनेकदा आपल्या जीवनात असं काही घडतं की, त्यावर विश्वास ठेवणं अवघडच नाही तर अशक्य होतं. एका महिलेला वृत्तपत्रात छापून आलेल्या जाहिरातीतून तिच्या पतीच्या दुसऱ्या परिवाराची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच महिलेला धक्का बसला आणि तिने आणखी खोलात जाऊन चौकशी सुरू केली.
टिकटॉकवर एका महिलेने आपल्या फॉलोअर्सला विचारलं होतं की, तिला तिच्या पतीच्या अफेअरबाबत कधी आणि कसं समजलं. यावर एका महिलेने उत्तर दिलं की, तिला तिच्या पतीच्या दुसऱ्या परिवाराचं सत्य न्यूजपेपरमधील जाहिरातीवरून समजलं होतं. तिच्या पतीने पेपरमध्ये त्याच्या मुलाचं नाव अनाउंस केलं होतं. ज्यात त्या हॉस्पिटलचा उल्लेख होता, जिथे मुलगा जन्माला आला होता. (हे पण वाचा : इश्क निकम्मा! ७ लेकरांची आई पडली मुलाच्या मित्राच्या प्रेमात; लग्नही केलं, आता कसा आहे त्यांचा संसार...)
जाहिरातीमध्ये आपल्या पतीचं नाव आणि सरनेम बघून महिला चक्रावून गेली. तिने हॉस्पिटलमध्ये फोन करून आणखी चौकशी केली. तेव्हा तिला समजलं की, या व्यक्तीला आणखी एक मुलगीही आहे. याचा अर्थ हा आहे की त्याने पूर्ण परिवार बनवला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेकडूनही त्याला ४ मुलं आहेत.
पतीचा भांडाफोड झाल्यावर महिला बिथरली. पतीचं इतकं मोठं सत्य समोर आल्याने ती शॉकमध्ये होती. पण तिने स्वत:ला सांभाळत आपला परिवार बनवला. महिलेने दुसरं लग्न आणि या लग्नाला आठ वर्षे झाली. ती दुसऱ्या पतीसोबत आनंदाने संसार करत आहे.