'फक्त बोलण्यासाठी मला बुक करतात पुरूष, देतात लाखों रूपये'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 01:05 PM2022-05-19T13:05:04+5:302022-05-19T13:07:00+5:30

सामन्थाने सांगितलं की, पुरूषांच्या सीक्रेट्सने मला दोन पुस्तके लिहिण्यासाठी इन्स्पायर केलं. सामान्यपणे पुरूष मला यासाठी बुक करतात कारण त्यांना बोलायचं असतं.

Woman charge in lakhs to men for just talking | 'फक्त बोलण्यासाठी मला बुक करतात पुरूष, देतात लाखों रूपये'

'फक्त बोलण्यासाठी मला बुक करतात पुरूष, देतात लाखों रूपये'

googlenewsNext

अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने दावा केला आहे की, अनेक पुरूष केवळ तिच्यासोबत बोलण्यासाठी अपॉयमेंट घेतात आणि त्या बदल्यात लाखो रूपये देतात. हे लोक तिला तिच्या त्यांच्या आयुष्यातील गोष्टी सांगतात. या महिलेने तिच्या या अनुभवावर दोन पुस्तकेही लिहिली आहेत.

महिलेचं नाव सामन्था आहे. ती ऑस्ट्रेलियाची राहणारी आहे. news.com.au साठी तिने लिहिलं की, मी स्वत:ला खूप प्रिविलेज मानते की, पुरूष माझ्याकडे येतात आणि आपल्या जीवनातील गोष्टी मला सांगतात. ते त्यांचे अनुभव मला सांगतात. त्यांच्या प्रेशरबाबत मला सांगतात. रिलेशनशिप आणि जीवनात काय योग्य आणि काय चुकीचं सुरू आहे त्याबाबत सांगतात.

सामन्थाने पुढे सांगितलं की, पुरूषांच्या सीक्रेट्सने मला दोन पुस्तके लिहिण्यासाठी इन्स्पायर केलं. सामान्यपणे पुरूष मला यासाठी बुक करतात कारण त्यांना बोलायचं असतं.

ती म्हणाली की, पैशांबाबत बोलणं बॅड मॅनर्स आहेत. पण मी फार जास्त चार्ज करते. मी लाखो रूपये घेते. तिने पुढे सांगितलं की, मला नेहमी याबाबत हैराणी होते की, पुरूष मला पैसे देतात, त्यांना काउन्सेलरची गरज असूनही.

सामन्थाने लिहिलं की, मी अनेकदा याबाबत बोलले आहे की, एका थेरपिस्टकडे जाणं त्यांच्यासाठी फार स्वस्त होईल. पण आश्चर्यकारकपणे ते माझ्याकडे येतात. ती सांगते की, ती एक थेरपिस्ट नाहीये आणि यासाठी तिने कोणतंही ट्रेनिंग घेतलेलं नाहीये. पण ती सांगते की, ती इथे फक्त ऐकण्यासाठी आणि मिठी मारण्यासाठी आहे.

सामन्था आधी एक पत्रकार होती. पण मग तिने तिचा ९ ते ५ वाजताचा जॉब सोडला. ३७ वर्षाच्या वयात तिने अ‍ॅडल्ट इंडस्ट्री जॉइन केली. ज्यानंतर तिने दोन पुस्तके लिहिली.

Web Title: Woman charge in lakhs to men for just talking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.