चमत्कार! मृत्यूनंतर ४५ मिनिटांनी जिवंत झाली महिला; ह्दयविकाराच्या झटक्यानं सोडले होते प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 01:42 PM2021-09-20T13:42:49+5:302021-09-20T13:45:05+5:30

द मिरर यात छापलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, मृत्यूनंतर जिवंत झालेल्या या महिलेचे नाव कॅथी पैटन असं आहे. कॅथी ही गोल्फ खेळत होती.

Woman clinically dead for 45 minutes brought back to life just before daughter gives birth | चमत्कार! मृत्यूनंतर ४५ मिनिटांनी जिवंत झाली महिला; ह्दयविकाराच्या झटक्यानं सोडले होते प्राण

चमत्कार! मृत्यूनंतर ४५ मिनिटांनी जिवंत झाली महिला; ह्दयविकाराच्या झटक्यानं सोडले होते प्राण

googlenewsNext
ठळक मुद्देतिच्या मोबाईलवर तिच्या मुलीचा कॉल आला आणि तिने सांगितले तिच्या पोटात वेदना होत आहेतकॅथी तातडीने गोल्फ सोडून घरी पोहचली आणि घरातून मुलीला घेऊन हॉस्पिटलला दाखल झाली.जेव्हा कॅथीला ह्दयविकाराचा झटका आला आणि त्या खाली कोसळल्या तेव्हा तात्काळ उपस्थित डॉक्टरांनी त्या महिलेची चाचणी केली

वॉश्गिंटन – एखाद्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होणं हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. अमेरिकेत सध्या असेच प्रकरण समोर आलं आहे. अमेरिकेच्या मॅरिलँड येथे राहणारी महिला मृत्यूनंतर ४५ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाल्याचं दिसून आलं. सध्या ही घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मृत्यूनंतर कुणाचं जिवंत होणं ही अशक्य अशी गोष्ट आहे. परंतु अमेरिकेतील या प्रकारानं डॉक्टरही हैराण झाले आहेत.

मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्याचा आला होत कॉल

द मिरर यात छापलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, मृत्यूनंतर जिवंत झालेल्या या महिलेचे नाव कॅथी पैटन असं आहे. कॅथी ही गोल्फ खेळत होती. तेव्हा तिच्या मोबाईलवर तिच्या मुलीचा कॉल आला आणि तिने सांगितले तिच्या पोटात वेदना होत आहेत. त्यानंतर कॅथी तातडीने गोल्फ सोडून घरी पोहचली आणि घरातून मुलीला घेऊन हॉस्पिटलला दाखल झाली. मुलीला उपचारासाठी दाखल केले तितक्यात महिलेला हॉस्पिटलमध्येच ह्दयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात त्या खाली कोसळल्या. त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांना लक्षात आलं. परंतु ४५ मिनिटांनी कॅथी पुन्हा जिवंत झाल्या. तोपर्यंत दुसरीकडे त्यांच्या मुलीनेही एका गोंडस मुलीला जन्म दिला.

जवळपास अर्धातास कॅथीला सीपीआर देण्यात आला

जेव्हा कॅथीला ह्दयविकाराचा झटका आला आणि त्या खाली कोसळल्या तेव्हा तात्काळ उपस्थित डॉक्टरांनी त्या महिलेची चाचणी केली. तेव्हा कॅथीचे पल्स चालत नव्हते आणि त्यांच्या मेंदूलाही ऑक्सिजन मिळत नव्हतं. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेला अर्ध्यातासाहून जास्त सीपीआर दिला. त्यानंतर अचानक ४५ मिनिटांनी त्यांच्या शरीराने हालचाल करण्यास सुरुवात केली. तेव्हा डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. सुदैवाने कॅथीचा जीव वाचला.

कॅथीने मानले देवाचे आभार

या प्रकारानंतर कॅथीने प्रतिक्रिया दिली की, देवाने मला नवं जीवदान दिलं आहे. आयुष्य जगण्यासाठी दुसरी संधी मिळाली आहे. मी देवाचे आभार मानते. माझ्या या नवीन जीवनासाठी मी खूप खुश आहे असं ती म्हणाली. तर घडलेला प्रकार कॅथीच्या मुलीला समजताच तीदेखील आनंदी झाली. माझ्या आईला माझ्या मुलीचा चेहरा बघायचा होता म्हणून तिला नवं आयुष्य मिळालं आहे. मी त्याबद्दल खूप आनंदी आहे असं कॅथीच्या मुलीने सांगितले.

Read in English

Web Title: Woman clinically dead for 45 minutes brought back to life just before daughter gives birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.