लग्न मंडपात बसला होता नवरदेव, आधीची पत्नी आली अन् घातला गोंधळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:10 PM2023-06-06T12:10:22+5:302023-06-06T12:10:37+5:30
इथे एका घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. इथे एका महिलेने घटस्फोटानंतर सेटलमेंटचे पैसे न मिळाल्याने आधीच्या पतीच्या लग्नात जाऊन गोंधळ घातला.
Woman Crashes Ex Husband’s Wedding: जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे कायदे असतात. पण जगात कुठेही पती-पत्नीमध्ये काही समस्या झाल्या तर काहीना काही किस्से समोर येतातच. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. इथे एका घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. इथे एका महिलेने घटस्फोटानंतर सेटलमेंटचे पैसे न मिळाल्याने आधीच्या पतीच्या लग्नात जाऊन गोंधळ घातला.
सामान्यपणे दोन लोक जेव्हा घटस्फोट घेतात तेव्हा याचा अर्थ असा होतो की, त्यांना कोणत्याही स्थितीत एकमेकांपासून वेगळं व्हायचं आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही केस जरा वेगळी आहे. इथे पती-पत्नीचा घटस्फोट झाला होता. पण व्यक्ती जेव्हा दुसरं लग्न करत होता तेव्हा आधीची पत्नी तिथे आली आणि तिने गोंधळ घातला.
ही घटना चीनच्या सिचुआन प्रांतातील असल्याचं सांगितलं जात आहे. इथे लुओ सरनेम असलेली महिला आधीच्या पतीच्या लग्नात पोहोचली. तिने लग्नात आलेल्या पाहुण्यांना काही पॅंम्प्लेट वाटणं सुरू केलं. तिने सोशल मीडियावरही एक मेसेज लिहिला होता. ज्यात तिने लिहिलं होतं की, 'मी माझ्या आधीच्या पतीच्या अनैतिक नात्यासाठी त्याला शुभेच्छा देते'. इतकंच नाही तर तिने लग्नादरम्यान एका मोठ्या बॅनरवर एक मेसेज लिहिला होता. ज्यात ती म्हणाली की, ती कायदेशीररित्या अजूनही त्याची पत्नी आहे. महिलेने असं केलं कारण तिला घटस्फोटावेळी ठरलेली सेटरमेंटची रक्कम मिळाली नव्हती.
या कपलचा घटस्फोट 2019 मध्ये झाला होता. सेटलमेंटनुसार महिलेच्या पतीला मुलीची कस्टडी मिळाली होती आणि त्याला आदेश दिला होता की, पत्नीला 1 मिलियन युआन म्हणजे 1 कोटी 15 लाख रूपये दे. तसेच दर महिन्याला मेन्टेनन्स म्हणून 5 हजार युआन म्हणजे 56 हजार रूपये देईल.
त्याशिवाय जोपर्यंत महिलेचं लग्न होत नाही तोपर्यंत त्याने तिचा मेडिकलचा खर्चही करावा आणि बिझनेस इन्शुरन्सही करावा. पतीने ही रक्कम तिला दिली नाही म्हणून महिला कोर्टात गेली होती. तिथेही तिला काही मदत मिळाली नाही तेव्हा ती त्याच्या लग्नात गेली आणि गोंधळ घातला. यानंतर पतीने तिच्यावर मानहानीची केस केली. सध्या तो तिला 3 टप्प्यात सगळी रक्कम देण्यासाठी तयार आहेत. तेच त्याने महिलेला सार्वजनिकपणे माफी मागण्यास सांगितलं.