बाबो! तब्बल 10 वर्षे फेक अकाऊंटवरून बहीणच फसवत राहिली; 'त्या' प्रेमाचं सत्य समजताच 'ती' हादरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 12:41 PM2022-01-05T12:41:04+5:302022-01-05T12:43:22+5:30

एका महिलेने आपलं फेक प्रोफाईल बनवलं, पण तिचा हा कारनामा तब्बल दहा वर्षांनंतर समोर आला. हैराण करणारी बाब म्हणजे या फेक प्रोफाईलच्या माध्यमातून ही तरुणी आपल्याच बहिणीला फसवत होती. 

woman create fake account on facebook catfish sister for 10 years england | बाबो! तब्बल 10 वर्षे फेक अकाऊंटवरून बहीणच फसवत राहिली; 'त्या' प्रेमाचं सत्य समजताच 'ती' हादरली

बाबो! तब्बल 10 वर्षे फेक अकाऊंटवरून बहीणच फसवत राहिली; 'त्या' प्रेमाचं सत्य समजताच 'ती' हादरली

googlenewsNext

सोशल मीडियाचा वापर हा हल्ली मोठ्या प्रमाणात केला जातो. पण असं असताना अनेक जण त्याचा चुकीचाही वापर करत आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे काही लोक सोशल मीडियावर फेक प्रोफाईल तयार करतात आणि इतर लोकांसोबत बोलू लागतात. त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात. पण काही वेळा फेक लोकांचं खोटं पकडलंही जातं आणि त्यामागचं धक्कादायक सत्य समोर येतं. अशीच एक घटना आता घडली आहे. लंडनमधील एका महिलेने आपलं फेक प्रोफाईल बनवलं, पण तिचा हा कारनामा तब्बल दहा वर्षांनंतर समोर आला. हैराण करणारी बाब म्हणजे या फेक प्रोफाईलच्या माध्यमातून ही तरुणी आपल्याच बहिणीला फसवत होती. 

सत्य समजल्यावर बहीण हादरली. तिला खूप मोठा धक्का बसला आहे. किरत अस्सी (Kirat Assi) असं लंडनमध्ये राहणाऱ्या महिलेचं नाव आहे आणि ती आधी रेडिओ जॉकी म्हणून काम करायची. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, किरतसोबत असं काही घडलं जे जाणून सगळेच हैराण झाले आहेत. किरतने दिलेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये बॉबी नावाच्या एका व्यक्तीसोबत ती फेसबुकवर जोडली गेली. किरतला नेहमी वाटत असे की बॉबी ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, मात्र जेव्हा तिला संशय आला तेव्हा तिने एक प्रायव्हेट गुप्तहेर नेमून यामागचं सत्य शोधलं.

चुलत बहीण बॉबी नावाने किरतसोबत बोलायची...

जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा या महिलेला धक्काच बसला. कारण प्रत्यक्षात बॉबी नावाचा कोणी व्यक्ती नव्हताच. तर किरतची चुलत बहीण सिमरन भोगल हीच 2009 पासून किरतसोबत फेसबुकवर जोडली गेली होती आणि बॉबी नावाने किरतसोबत बोलायची. तिने किरतला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. इतकंच नाही तर सिमरन किरतच बॉबीसोबत ऑनलाईन बोलणं करून देण्यासाठीही तिची मदत करत असे. सिमरनने मस्करीतच बॉबी बनून किरतसोबत प्रेमाचं नाटक केलं आणि तिच्यासोबत लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप कायम ठेवलं.

सिमरनने तब्बल 50 फेक प्रोफाईल बनवले 

रिपोर्टनुसार सिमरनने तब्बल 50 फेक प्रोफाईल बनवले होते, जेणेकरून ती किरतला हे पटवून देऊ शकेल की बॉबी खरंच कोणीतरी व्यक्ती आहे. सत्य समोर येताच किरतने आपल्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली मात्र हे प्रकरण कोर्टाच्या बाहेरच सोडवण्यात आलं. किरतने आता आपल्या बहिणीच्या विरोधात कॅटफिशिंगता आरोप केला आहे. कॅट फिशिंग म्हणजे आपलं सत्य लपवून किंवा नकली माणसाच्या नावाने एखाद्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणं आणि रिलेशनशिप ठेवणं. किरतने सांगितलं की ही मस्करी नसून या गोष्टीचा तिच्या मानसिक आरोग्यावर खूपच वाईट परिणाम झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: woman create fake account on facebook catfish sister for 10 years england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.