80 रूपयात तिला घरी घेऊन आला, 1 तासाने पैसे देण्यास दिला नकार; महिलेने चाकूने कापला प्रायव्हेट पार्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 16:17 IST2023-05-02T16:17:32+5:302023-05-02T16:17:42+5:30

इथे एका व्यक्तीने महिलेला 80 रूपये देण्यास नकार दिला होता. यानंतर महिलेला राग आला आणि तिने चाकूने त्या व्यक्तीवर हल्ला करून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.

Woman cut client body part after he refused giving 80 rupees after 1 night | 80 रूपयात तिला घरी घेऊन आला, 1 तासाने पैसे देण्यास दिला नकार; महिलेने चाकूने कापला प्रायव्हेट पार्ट!

80 रूपयात तिला घरी घेऊन आला, 1 तासाने पैसे देण्यास दिला नकार; महिलेने चाकूने कापला प्रायव्हेट पार्ट!

आजकाल पैशांशिवाय कोणतंही काम होत नाही. काही लोक पैशांसाठी काहीही करायला तयार होतात. अशात त्या महिलांबाबत विचार करा ज्यांना पोट भरण्यासाठी शरीर विकावं लागतं. अशातही जेव्हा मन मारून असं करावं लागत असेल आणि ग्राहक पैसे देण्यास नकार देत असतील तर त्या महिलेला किती राग येईल याचाही विचार करा. याच रागात एका महिलेने एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कापला.

ही घटना आफिकेच्या मलावीमधील आहे. इथे एका व्यक्तीने महिलेला 80 रूपये देण्यास नकार दिला होता. यानंतर महिलेला राग आला आणि तिने चाकूने त्या व्यक्तीवर हल्ला करून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. पोलिसांनी सांगितलं की, महिलेला अटक करण्यात आली आहे आणि तिच्यावर गंभीर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या महिलेचं नाव पॅट्रिसिया विसन असं आहे.

मलावीच्या मंकी बे मधील ही घटना आहे. पोलिसांनी सांगितलं की, 28 एप्रिलची ही घटना आहे. पॅट्रिसिया रात्री या व्यक्तीला भेटली आणि दोघांमध्ये पैसे देऊन संबंध ठेवण्याचं ठरलं. ही डील 80 रूपयांमध्ये ठरली होती. त्यानंतर महिला त्या व्यक्तीच्या घरी गेली. एक तासानंतर पॅट्रिसियाने तिचे हक्काचे पैसे मागितले तर व्यक्ती पैसे देण्यास नकार दिला. याचा पॅट्रिसियाला राग आला आणि तिने चाकूने व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कापला.

व्यक्तीची आरडाओरड ऐकून शेजारी लोक तिथे आले. त्यानंतर व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केलं. मलावी 24 च्या रिपोर्टनुसार, महिलेला अटक करण्यात आली आहे आणि तिच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला म्हणाली की, तिने हल्ला तिच्या हक्काच्या पैशांसाठी केला. जे त्या व्यक्तीने देण्यास नकार दिला होता.

Web Title: Woman cut client body part after he refused giving 80 rupees after 1 night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.