अरेरे! महिलेला हवे होते मांजरीसारखे डोळे; सर्जरीनंतर चेहऱ्याची झाली भयंकर अवस्था, आता म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 09:41 AM2023-05-16T09:41:20+5:302023-05-16T11:03:47+5:30

खूप दिवसांपासून मांजरासारखे डोळे हवे होते. तिचे डोळे मांजरासारखे दिसावेत अशी तिची इच्छा होती.

woman deforms face to get cat eyes shares pictures after procedure | अरेरे! महिलेला हवे होते मांजरीसारखे डोळे; सर्जरीनंतर चेहऱ्याची झाली भयंकर अवस्था, आता म्हणते...

अरेरे! महिलेला हवे होते मांजरीसारखे डोळे; सर्जरीनंतर चेहऱ्याची झाली भयंकर अवस्था, आता म्हणते...

googlenewsNext

देवाने जगातील प्रत्येक गोष्ट अतिशय विचारपूर्वक निर्माण केली आहे. त्याच्या दृष्टिकोनातून सर्व काही सुंदर आहे. पण अनेक वेळा लोकांना त्यांचा नैसर्गिक रंग किंवा आकार आवडत नाही. यामुळे हे लोक कॉस्मेटिक सर्जरीचा अवलंब करतात. कधीकधी त्याचा परिणाम त्यांना सुंदर बनवतो. तर कधी असं करणं त्यांना महागात देखील पडतं. 

सोशल मीडियावर एका महिलेने तिच्यासोबत घडलेली अशीच एक घटना शेअर केली आहे. 37 वर्षीय नसरीन कफील्डला खूप दिवसांपासून मांजरीसारखे डोळे हवे होते. तिचे डोळे मांजरीसारखे दिसावेत अशी तिची इच्छा होती. पण तिने जसा विचार केला होता तसे डोळे शस्त्रक्रियेनंतर दिसले नाहीत. तिचे डोळे खराब झाले आणि चेहरा विचित्र झाला. 

नसरीनने तिचे काही फोटो लोकांसोबत शेअर केले आहेत. आधी आणि नंतर ज्यांनी तिला पाहिले त्या प्रत्येकाने सर्जरी केल्याबद्दल खेद व्यक्त केला. मात्र, हे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. नसरीनने शस्त्रक्रियेनंतरचा एक व्हिडिओही शेअर केला ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले. नसरीनचा पूर्वीचा लूक बहुतेकांना आवडला होता.

अनेकांनी कमेंट केली की एवढं डोळे वर करण्यात काय अर्थ आहे? कोणतीही कॉस्मेटिक सर्जरी केल्यावर सुरुवातीला चेहऱ्यावर सूज येते. यामुळे चेहरा विचित्र दिसू लागतो. पण हळूहळू त्यात सुधारणा होऊ लागते. असंच काहीसं नसरीनच्या बाबतीत घडलं. आता त्याच्या चेहऱ्यावरची सूज कमी झाली, मग चेहरा पूर्वीपेक्षा चांगला दिसू लागला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: woman deforms face to get cat eyes shares pictures after procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.