तब्येत बरी नाही म्हणून टेस्ट करायला गेली अन् रिपोर्ट पाहताच पायाखालची जमिनच सरकली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 11:22 AM2022-02-06T11:22:42+5:302022-02-06T11:25:29+5:30
एका महिलेसोबत असंच घडलं. एक दिवस तिची तब्येत ठीक नसल्याने ती डॉक्टरकडे गेली होती. मात्र, टेस्टमध्ये तिला जे काही समजलं ते हैराण करणारं होतं.
कधी कधी आपलं शरीर आपल्याला योग्य ते सिग्नल देत नाही. त्यामुळे शरीरात काय चाललंय याची माहिती आपल्याला मिळत नाही. एका महिलेसोबत असंच घडलं. एक दिवस तिची तब्येत ठीक नसल्याने ती डॉक्टरकडे गेली होती. मात्र, टेस्टमध्ये तिला जे काही समजलं ते हैराण करणारं होतं.
द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, २० वर्षाची जेस टिकटॉकवर बरीच प्रसिद्ध आहे. ती अनेकदा आपल्या आयुष्याबद्दलचे व्हिडिओ शेअऱ करत राहाते. नुकतंच तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिने एका हैराण करणाऱ्या घटनेचा खुलासा केला. जेसने सांगितलं की जेव्हा ती 18 वर्षाची होती, तेव्हा ती एका व्यक्तीला भेटली आणि तो तिला आवडू लागला. (Woman Shocked to Know about her Pregnancy)
या दोघांना भेटून चार महिने झालेले असतानाच जेसीला एक दिवस रुग्णालयात जावं लागलं. तिने सांगितलं की तिची तब्येत या काळात ठीक वाटत नव्हती. यामुळे तिने रुग्णालयात जाऊन चेकअप करण्याचा निर्णय घेतला. रुग्णलयात चेकअप करून डॉक्टरांनी जेव्हा तिच्या तब्येतीबाबत खुलासा केला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली (Woman Shocked after Seeing Checkup Report). डॉक्टरांनी सांगितलं की ती 26 आठवड्यांची गर्भवती आहे आणि तिला क्रिप्टिट प्रेग्नंसी (Cryptic Pregnancy) आहे. म्हणजेच ती प्रेग्नंसी ज्यात मेडिकल टेस्टिंगमध्येही प्रेग्नंसीबद्दल समजत नाही. यात महिलांना गरोदर असताना उलट्याही होत नाहीत आणि त्यांची मासिक पाळीही सुरूच राहाते. यासोबत पोटही जास्त दिसत नाही.
जेसने सांगितलं, की तेव्हा अनेकांनी तिची निंदा केली की चार महिन्यातच तू या व्यक्तीच्या इतकी जवळ कशी आली. जेसने सांगितलं की प्रेग्नंसीच्या आधीपर्यंत ती पीरियड्स थांबवण्यासाठी औषधं खात असल्याने मासिक पाळीवरुनही तिला हे समजू शकलं नाही. ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी तिने एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तिच्या बॉयफ्रेंडने तिला साथ दिली आणि दोघं २ वर्षांपासून सोबत आहेत. त्यांना आता 18 महिन्यांचं बाळही आहे. त्यांनी आपल्यासाठी एक घरही खरेदी केलं आहे.