15 वर्षाच्या संसारानंतर पतीला 'भाऊ' बनवलं, पत्नीने दुसऱ्यासोबत केलं लग्न आणि आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:42 PM2024-01-18T15:42:50+5:302024-01-18T15:45:25+5:30

एका महिलेने लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या पतीला भाऊ बनवलं. नंतर एका दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं, जिथे तिघेही होते.

Woman divorced husband then became his legal guardian with her new partner | 15 वर्षाच्या संसारानंतर पतीला 'भाऊ' बनवलं, पत्नीने दुसऱ्यासोबत केलं लग्न आणि आता...

15 वर्षाच्या संसारानंतर पतीला 'भाऊ' बनवलं, पत्नीने दुसऱ्यासोबत केलं लग्न आणि आता...

पती-पत्नीचं नातं एक खास नातं असतं. दोघेही लग्नावेळी आयुष्य सोबत घालण्याची शपथ घेतात. सुख-दुख:त एकमेकांची साथ देण्याचा निश्चय करतात. पण तुम्ही कधी ऐकलंय का की, एखाद्या पती-पत्नीने आपलं नातं बदललं आणि ते भाऊ-बहीण झाले? अशी एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. इथे एका महिलेने लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या पतीला भाऊ बनवलं. नंतर एका दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं, जिथे तिघेही होते.

द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार टेक्सासमध्ये राहणारी क्रिसची कहाणी हैराण करणारी आहे. 16 वर्षाची असताना क्रिसची एका ब्रॅंडन नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. दोघेही 90च्या काळातील प्रेम जगत होते, एकमेकांना पत्र पाठवत होते. आवडत्या गाण्यांची सीडी पाठवत होते आणि बीचवर फिरायला जात होते. काही वर्षानी ऑगस्ट 2006 मध्ये त्यांनी लग्न केलं. तेव्हा क्रिस 22 वर्षांची होती. सगळंकाही स्वप्नवत वाटत होतं. पण जेव्हा स्वप्न तुटतं तेव्हा फार वाईट वाटतं.

'भाऊ' बनला पती

क्रिससोबतही असंच काहीसं घडलं. लग्नाच्या दोन वर्षानी म्हणजे जेव्हा ती 24 वर्षांची होती तेव्हा पती ब्रॅंडनचा एक भीषण अपघात झाला. त्याचा जीव तर वाचला, पण तो दोन महिने कोमात होता. कोमातून बाहेर आल्यावर अनेक महिने त्याची थेरपी सुरू होती. त्याच्या मेंदुला इजा झाली असल्याने तो व्हीलचेअरवर अवलंबून होता आणि रोजची कामे करण्यासाठी त्याला क्रिसची मदत लागत होती. हळूहळू क्रिसच्या मनात ब्रॅंडनसाठी प्रेमाच्या भावनेपेक्षा सेवाभाव जास्त वाढला. ब्रॅंडनलाही तिच्यात पत्नीऐवजी बहीण दिसू लागली. त्याने टिकटॉकवर एका व्हिडिओत सांगितलं की, त्याच्यासाठी या नात्याला भाऊ-बहिणीचं नातं माननं जास्त चांगलं होतं.

पत्नीने सुरू केलं ऑनलाईन डेटिंग

दोघांच्याही भावनांमध्ये बदल झाले होते, पण क्रिस नेहमीच ब्रॅंडनसाठी उपलब्ध होती. अपघाताच्या साधारण 2 वर्षानंतर तिला असं वाटलं की, आता तिला या स्थितीत आणखी रहायचं नाहीये. तिला जीवनात पुढे जायचं आहे. पण ब्रॅंडनला तिला मागे सोडायचं नव्हतं. ब्रॅंडनलाही यावर काही आक्षेप नव्हता. कारण त्यालाही माहीत होतं की, क्रिसला परिवार आणि मुलंही हवी आहेत. दोघेही प्रेम संबंधात नव्हते, पण क्रिस त्याची काळजी घेत होती. तसेच त्याची लीगल गार्डीयनही होती. 2014 मध्ये क्रिसने ऑनलाइन डेटिंग सुरू केली आणि तिची भेट जेम्ससोबत झाली.
जेम्स एक सिंगल फादर होता. त्यामुळे त्यालाही क्रिसच्या समस्या माहीत होत्या. त्याला यावर काहीच आक्षेप नव्हता की, त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहूनही तिला आपल्या पतीची काळजी घ्यायची होती. दोन्ही पुरूष एकमेकांना भेटले आणि त्यांना चांगलंही वाटलं. 

द सननुसार, हे तर समजू शकलं नाही की, क्रिस आणि ब्रॅंडनने घटस्फोट कधी घेतला. पण क्रिसने जेम्ससोबत लग्न केलं आणि तिच्या आधीच्या पतीने यात तिला साथ दिली. आता ब्रॅंडन, जेम्स आणि क्रिस सोबत राहतात. त्यांच्यात चांगलं नातं आहे. 

Web Title: Woman divorced husband then became his legal guardian with her new partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.