लुटेरी दुल्हन! लग्नाचं आमिष दाखवून लांबवले 1.65 कोटी रूपये, मॅट्रिमोनी साइटवर होतं फेक अकाऊंट...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:17 PM2020-06-02T15:17:32+5:302020-06-02T15:19:37+5:30

पोलीस हैराण तेव्हा झाले जेव्हा या महिलेला अटक झाल्याची बातमी मिळताच आणखी एक तरूण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.

Woman duped more than 1 crore from techie on pretext of marriage api | लुटेरी दुल्हन! लग्नाचं आमिष दाखवून लांबवले 1.65 कोटी रूपये, मॅट्रिमोनी साइटवर होतं फेक अकाऊंट...

लुटेरी दुल्हन! लग्नाचं आमिष दाखवून लांबवले 1.65 कोटी रूपये, मॅट्रिमोनी साइटवर होतं फेक अकाऊंट...

Next

तेलंगानाच्या हैदराबादमध्ये पोलिसांनी लग्नाच्या नावावर अमेरिकेतील एका एनआरआयकडून 65 लाख रूपये उकडणाऱ्या महिलेला अटक केली होती. पोलीस हैराण तेव्हा झाले जेव्हा या महिलेला अटक झाल्याची बातमी मिळताच आणखी एक तरूण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्यानेही पोलिसांना सांगितले की, त्यालाही या महिलेने लग्नाचे आमिष दाखवून एक कोटी रूपये लुटले आहेत.

केपीएचबी पोलिसांनी मॅट्रिमोनी फ्रॉडमध्ये एका 44 वर्षीट मालविका देवती नावाच्या महिलेला अटक केली होती. 33 वर्षीय तरूणाने पोलिसांना महिलेसोबत व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामवर केलेली चॅटींगही दाखवली. त्याने सांगितले की, मालविकाने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याची सगळी सेव्हिग्स हडपली.

मालविका आणि तिचा 22 वर्षीय मुलगा प्रणव ललित गोपाल यालाही जुबली हिल्स पोलिसांनी 27 मे रोजी अटक केली होती. दोघांवरही यूएसमधील एका एनआरआयला लग्नाचं आमिष दाखवून 65 लाख रूपये हडपण्याचा आरोप होता. पोलिसांनी सांगितले की, याआधी मालविका विरोधात आणखी दोन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी आहेत.

पोलिसांनी सांगितले की, 33 वर्षीय पीडित 2018 मध्ये एका तेलुगु मॅट्रिमोनी साइटच्या माध्यमातून मालविकाच्या संपर्कात आला होता. तिने या साइटवर अनु पल्लवी मगंती नावाने फेक प्रोफाइल तयार केलं होतं. तिने स्वत:ला या साइटवर एक भारतीय वंशाची डॉक्टर सांगितले होते. तसेच आता यूएसमध्ये काम करत असल्याचे सांगितले होते.

मालविकाने तरूणाला याचाही विश्वास दिला की, ती एका राजकीय परिवारातून आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये तिने तरूणाला सांगितले की, तिचा फोन हॅक झाला आहे आणि ती तिचं अकाउंट ऑपरेट करू शकत नाहीय. तिने काही अडचण सांगत त्याच्याकडून पैसे मागितले. तरूणाने सुद्धा मालविकाच्या दोन बॅंक अकाउंटमध्ये 1.02 कोटी रूपये ट्रान्सवर केले होते.

आयटी प्रोफेशनलने सांगितले की, त्याचं मासिक वेतन 80,000 रूपये आहे. त्याने सगळे खर्च उचलून ही सेव्हिंग्स केली होती. मालविकाने त्याच्याशी खोटं बोलून हे पैसे मागितले. पोलिसांनी मालविका विरोधात गुन्हा दाखल केलाय.

Web Title: Woman duped more than 1 crore from techie on pretext of marriage api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.