'भंगार' विकून महिन्याला 4 लाख रूपये कमावते ही महिला, आयडिया अशी तुम्हीही सुरू कराल बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 10:49 AM2023-05-04T10:49:49+5:302023-05-04T10:51:48+5:30

एका महिलेने तिची कॉर्पोरेट नोकरी सोडून कचरा घेणं आणि विकणं सुरू केलं आहे. ज्यातून ती महिन्याला 4 लाख रूपये कमाई करते.

Woman earns 4 lakh rupees every month by selling garbage | 'भंगार' विकून महिन्याला 4 लाख रूपये कमावते ही महिला, आयडिया अशी तुम्हीही सुरू कराल बिझनेस

'भंगार' विकून महिन्याला 4 लाख रूपये कमावते ही महिला, आयडिया अशी तुम्हीही सुरू कराल बिझनेस

googlenewsNext

Trending News: एखाद्या व्यक्तीचा कचरा दुसऱ्या व्यक्तीसाठी खजिना ठरू शकतो. याचंच उदाहरण असलेली एक घटना समोर आली आहे. लोकांचा कचरा एका महिलेसाठी इन्कमचा सोर्स बनला आहे. एका महिलेने तिची कॉर्पोरेट नोकरी सोडून कचरा घेणं आणि विकणं सुरू केलं आहे. ज्यातून ती महिन्याला 4 लाख रूपये कमाई करते. यूएसच्या पेन्सिलवेनियाच्या क्वार्कटाउन येथे राहणारी 32 वर्षीय वेरोनिका टेलरने डंपस्टर डायविंगला एका प्रॉफिटेबल बिझनेसमध्ये बदललं आहे.

वेरोनिका टेलरने आधी अनेक ऑथेन्टिक डिजायनर वस्तू कचऱ्यातून उचलणं सुरू केलं. या वस्तू लोक फेकून देत होते. त्या वस्तू कचऱ्यातून उचलून त्या पुन्हा व्यवस्थित करत होती आणि चांगल्या किंमतीत विकते. यात तिला तिची 38 वर्षीय मैत्रीण लिज विल्सनही हिचीही साथ मिळाली. 

टेलरने या वस्तू व्हाट्सनॉट लिलाव अॅपच्या माध्यमातून या वस्तूंची मार्केटिंग केली. वेरोनिकाने वेरोनिका या कचऱ्यातील वस्तू चांगल्या किंमतीत विकत आहे. यातून तिला फायदाही मिळत आहे. आपल्या परिसरातील कचऱ्याचा तिने क्रिएटिव वापर केला आणि आपला बिझनेस उभा केला.

या वस्तूंना चांगली किंमत मिळू लागली आणि आता ती यांच्या माध्यमातून महिन्याला 4 लाख रूपये कमाई करत आहे. वेरेनिका म्हणाली की, 'हे वास्तवात एका रिअल लाइफ खजिन्याला शोधण्यसारखं आहे. ही फार चांगली आयडिया आहे'. टेलर आणि लिज विल्सन यांनी मिळून जून 2022 मध्ये डंपस्टर डायविंग सुरू केली, हे त्यांनी आधी केवळ आवड म्हणून केलं. त्यांना हे आवडलं. पुढे फेब्रुवारी 2023 पर्यंत वेरोनिका टेलरचं हे काम मोठ्या बिझनेसमध्ये बदललं. आता तिचा हा बिझनेस लाखो रूपयांचा झाला आहे. 

Web Title: Woman earns 4 lakh rupees every month by selling garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.