एका पैशाचीही गुंतवणूक न करता लाखो कमावते ही महिला, तुम्हीही करू शकता हे काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 11:09 AM2024-03-07T11:09:55+5:302024-03-07T11:11:37+5:30

एका महिलेने पैसे कमावण्याची एक वेगळीच आयडिया शोधली आहे. जी कुणीही करू शकतं.

Woman earns in lakhs by flipping junk on facebook | एका पैशाचीही गुंतवणूक न करता लाखो कमावते ही महिला, तुम्हीही करू शकता हे काम!

एका पैशाचीही गुंतवणूक न करता लाखो कमावते ही महिला, तुम्हीही करू शकता हे काम!

सगळ्यांनाच असं वाटत असतं की, नोकरी अशी मिळावी ज्यात जास्त काम नसावं आणि पैसे भरपूर मिळावे. परिवार असेल तर पैशांची जास्त गरज पडते. खासकरून महिलांसाठी बाळांना जन्म दिल्यावर काम करणं फारच अवघड होतं. पण एका महिलेने पैसे कमावण्याची एक वेगळीच आयडिया शोधली आहे. जी कुणीही करू शकतं.

ही महिला काही फार शिकलेली नाही किंवा तिच्या स्पेशल डिग्री नाही. ती आधी ज्वेलर होती. पण आता ती मुलं आणि घर सांभाळून घरातूनच भंगार विकण्याचा बिझनेस करते. यासाठी महिला दिवसातील काही तास वेळ काढते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आरामात वर्षाला  3 ते 4 लाख रूपये कमाई करते.

34 वर्षीय रुथ चिपरफील्ड नावाची महिला ना तिचे खाजगी फोटो विकते ना कोणतं लाजीरवाणं काम करते. तरीही ती घरी बसून आपला बिझनेस करून लाखो रूपयांची कमाई करते. 

ती भंगारातील वस्तू विकते आणि या बदल्यात तिला लाखो रूपये मिळाले आहेत. यात तिला काही इन्व्हेस्टमेंट करावी लागली ना काही. पण 5 वर्षात तिने 17 लाख रूपये कमाई केली आहे. एकदा तर महिलेने 24 तासात 43 हजार रूपये कमाई केली होती. तिने वस्तू फेसबुकवर विकल्या होत्या. हे सगळं काम ती घरात बसून करते.

रुथने सांगितलं की, ती ज्या वस्तू खरेदी करते त्या काही कामाच्या नसतात. त्या ती विकते. फेसबुकवर मार्केटप्लेसच्या माध्यमातून ती याची डील करते. 2018 पासून तिने हे काम सुरू केलं होतं. तिने एका दिवसात 42 हजारांच्या वस्तू विकल्या होत्या. ती ज्वेलरीपासून फर्नीचर, टूल्स आणि मुलांसंबंधी गोष्टी विकते. ती दुसरीकडून वस्तू विकत घेते आणि फेसबुकवर विकते.

Web Title: Woman earns in lakhs by flipping junk on facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.