चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडली, तिच्या वरुन ट्रेन गेली तरी राहिली जिवंत, कशी? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:52 PM2022-04-19T15:52:47+5:302022-04-19T16:09:44+5:30

या महिलेलाही कळालं नाही की अचानक ती मृत्यूच्या दारात कशी गेली. खरंतर ही महिला स्टेशनवर ट्रॅकजवळ उभी होती. पण नंतर असं काही घडलं की ती थेट मृत्यूच्या दारात पोहोचली.

woman faints on railway platform and falls down but stays alive know how | चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडली, तिच्या वरुन ट्रेन गेली तरी राहिली जिवंत, कशी? घ्या जाणून

चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडली, तिच्या वरुन ट्रेन गेली तरी राहिली जिवंत, कशी? घ्या जाणून

googlenewsNext

नशिबासमोर कोणाचाचं काही चालत नाही, असं म्हणतात. जर तुमच्या नशिबात आयुष्य लिहिलं असेल तर मोठ्या अपघातातूनही तुम्ही वाचू शकता. असाच काहीसा प्रकार स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत घडला. या महिलेलाही कळालं नाही की अचानक ती मृत्यूच्या दारात कशी गेली. खरंतर ही महिला स्टेशनवर ट्रॅकजवळ उभी होती. पण नंतर असं काही घडलं की ती थेट मृत्यूच्या दारात पोहोचली.

या महिलेचं नशीब बलवत्तर होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कंडेला नावाची ही महिला रेल्वे स्टेशनवर उभी होती. तेवढ्यात तिथून एक ट्रेन जाऊ लागली. त्याचवेळी कंडेला हिला चक्कर आल्याने ती चालत्या ट्रेनखाली पडली (Woman Falls Under Running Train). संपूर्ण ट्रेन महिलेच्या अंगावरून गेली. महिलेचा मृत्यूशी झालेला हा सामना पाहून सगळेच शॉक झाले. मात्र ट्रेन गेल्यावर कंडेला सुखरूप असल्याचं समजलं. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स येथील एका स्टेशनवर ही घटना घडली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, ही महिला जिवंत कशी राहिली यावर विश्वास बसत नाही. ती बेशुद्ध पडली आणि चालत्या ट्रेनखाली आली. ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पासिंग ट्रेनच्या दोन बोगींमधील जागेतून कंडेला खाली पडली होती. या घटनेनंतर ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली, त्यानंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिला ट्रॅकच्या शेजारी उभी होती. ट्रेन आली तेव्हा तिला चक्कर येत असल्याचं दिसलं. यानंतर ती दोन बोगींमधील जागेत पडली. हा प्रकार समजताच तिथे लोकांची गर्दी झाली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असेल, असं सर्वांना वाटत होतं. पण असं झालं नाही. महिलेनं एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, हा तिचा पुनर्जन्म आहे. या भीषण अपघातानंतरही ती जिवंत आहे, यावर तिचा विश्वास बसत नाही.

Web Title: woman faints on railway platform and falls down but stays alive know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.