पहाटे पहाटे तिला जाग आली; Fitbitवर बॉयफ्रेंडचा 'मध्यरात्रीचा पराक्रम' पाहून झोपच उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 04:38 PM2021-03-10T16:38:34+5:302021-03-10T16:43:36+5:30
FitBit Smartwatch: फिटबिटवर आलेल्या नोटिफिकेशनमुळे लबाडी उघड; तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
स्मार्टवॉचमध्ये असलेल्या फीचर्समुळे जीव वाचल्याच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. स्मार्टफोनमध्ये असणारे आरोग्याशी संबंधित फीचर्स अनेकांसाठी महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास, शरीराबद्दलची तपशीलवार माहिती मिळण्यास मोलाची मदत होते. मात्र आता याच स्मार्टवॉचमुळे लबाडीदेखील पकडली जाऊ लागली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या नाडिया इसेक्स यांना त्यांचा बॉयफ्रेंड फसवणूक करत असल्याची माहिती फिटबिट स्मार्टवॉचमुळे (FitBit Smartwatch) समजली. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
काय सांगता? चक्क म्हशीची डीएनए चाचणी होणार; कारण वाचून चक्रावून जाल
रिलेशनशिप एक्स्पर्ट असणाऱ्या नाडिया यांनी त्यांच्या टिकटॉक अकाऊंटवर त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे. स्वत:सोबत घडलेली घटना नाडिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. 'माझा एक्स बॉयफ्रेंड नाईट आऊटनंतर घरी परतला. मी त्याच्यासाठी ब्रेकफास्ट तयार करण्याचा विचार केला. पण त्याआधी मला माझ्या फिटबिटवर एक नोटिफिकेशन आलं. मी आणि माझ्या बॉयफ्रेंडनं आमची फिटबिट वॉचेस सिंक्रोनाईज्ड केली होती,' असं नाडियानं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
अमेरिकेच्या या गावातील प्रत्येक घरासमोर कारऐवजी पार्क असतं एक विमानं!
'आम्ही सिंक्रोनाईज्ड केलेल्या माझ्या फिटबिटवर नोटिफिकेशन आलं. रात्री २ ते ३ च्या दरम्यान त्यानं जवळपास ५०० कॅलरी बर्न केल्याची माहिती नोटिफिकेशनमध्ये होती,' असं नाडिया यांनी व्हिडीओत पुढे म्हटलं आहे. मध्यरात्री बॉयफ्रेंड ५०० कॅलरी बर्न करत असताना तो आपल्यासोबत नव्हता, ही बाब नाडिया यांना लक्षात आली. त्यामुळे ५०० कॅलरी नेमक्या कशा आणि कुठे बर्न झाल्या असाव्यात याचा अंदाज त्यांनी बांधला. यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
काय सांगता! दारूच्या एका ग्लासाची किंमत वाचून व्हाल अवाक्, ४० लाखात विकले गेले 'लक्झरी शूज'
नाडिया यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. टिकटॉकवर आतापर्यंत ४ लाख २३ हजार लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. तुझा बॉयफ्रेंड कदाचित नाईट क्बलमध्ये नाचत असावा, अशी प्रतिक्रिया एकानं नाडियाच्या व्हिडीओवर दिली. त्यावर तुम्ही विचार केलेली गोष्ट झालेला नाही, असं उत्तर नाडियानं दिलं. नाडिया यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.