घरातली काच फुटली म्हणून घाबरली महिला, वाटलं चोर आला पण निघालं त्याहुनही भयानक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:03 PM2022-03-21T13:03:59+5:302022-03-21T13:07:29+5:30

क्वीन्सलँडच्या सनशाइन कोस्ट भागातील व्हिलेज ग्लेनव्ह्यू येथे राहणाऱ्या महिलेला वाटलं की तिच्या स्वयंपाकघरातून काच फुटल्यासारखा काहीतरी आवाज ऐकू येतोय. कोणीतरी आपल्या घरात घुसलं असल्याची शंका तिला आली.

woman finds python in houses in the cupboard | घरातली काच फुटली म्हणून घाबरली महिला, वाटलं चोर आला पण निघालं त्याहुनही भयानक!

घरातली काच फुटली म्हणून घाबरली महिला, वाटलं चोर आला पण निघालं त्याहुनही भयानक!

Next

एका ऑस्ट्रेलियन महिलेला वाटलं की तिला रात्री तिच्या स्वयंपाकघरात चोर आल्याचा आवाज आला, पण जेव्हा ती तिच्या स्वयंपाकघरात गेली तेव्हा शॉक झाली. ती किचनमध्ये गेली असता तिथे एक महाकाय अजगर फिरत असल्याचं तिने पाहिलं (Python in Kitchen). क्वीन्सलँडच्या सनशाइन कोस्ट भागातील व्हिलेज ग्लेनव्ह्यू येथे राहणाऱ्या महिलेला वाटलं की तिच्या स्वयंपाकघरातून काच फुटल्यासारखा काहीतरी आवाज ऐकू येतोय. कोणीतरी आपल्या घरात घुसलं असल्याची शंका तिला आली.

महिला प्रचंड घाबरली होती. त्यामुळे घरात चोर असल्याचं जाणवल्याने तिने स्थानिक पोलिसांना बोलावलं. मात्र, तिने जेव्हा स्वयंपाकघरात धाव घेतली तेव्हा तिला कपाटात एक भलामोठा अजगर आरामात बसलेला दिसला. त्यानंतर साप पकडणाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आणि अजगराला पकडण्यात आलं.

यानंतर सर्पमित्र अजगराला तिथून घेऊन गेले. या घटनेचा एक व्हिडिओ (Python Viral Video) फेसबुकवर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, एक व्यक्ती काठीने किचनमध्ये साप पकडण्यासाठी जात आहे. सापाच्या व्हिडिओंला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसते. हा व्हिडिओ पाहूनही नेटकरी थक्क झाले आहेत.

अजगराला रेस्क्यू करणाऱ्या व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिलं की, 'मी पुढे जाऊन त्याला पकडलं आणि नंतर त्याला झुडुपात परत पाठवलं.' ते पुढे म्हणाले, 'कालची रात्र खूप व्यस्त होती, आजूबाजूच्या परिसरात बरेच साप फिरत होते आणि काही घरात घुसले होते.' व्हिडिओला 55k पेक्षा जास्त व्ह्यूज आणि हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Web Title: woman finds python in houses in the cupboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.