महिलेच्या हाती लागला मोठा खजिना, हजारो वर्षाआधी राजाने केला होता दफन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:41 AM2023-05-03T10:41:13+5:302023-05-03T10:42:36+5:30
राजाच्या महालाच्या अंगणात हा खजिना सापडला आहे. याआधीही याच ठिकाणी एक खजिना सापडला होता. यात चांदीच्या नाण्यांनी भरलेली दोन मडकी सापडली होती.
असं म्हणतात की, कधी कुणाचं नशीब चमकेल काहीच सांगता येत नाही. जर नशीब चांगलं असेल तर व्यक्ती झोपड्यातून महालातही जाऊ शकतो. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. या महिलेला एका पडक्या महालाच्या अंगणात खजिना सापडला आहे. तिला साधारण तीनशे चांदीच्या नाण्यांसोबत काही दागिने आणि काही मूल्यवान वस्तू सापडल्या आहेत. हे सगळं काही हजार वर्षाआधी एका राजाने जमिनीत लपवून ठएवलं होतं. या कथा लोकांनी फक्त ऐकल्या होत्या.
राजाच्या महालाच्या अंगणात हा खजिना सापडला आहे. याआधीही याच ठिकाणी एक खजिना सापडला होता. यात चांदीच्या नाण्यांनी भरलेली दोन मडकी सापडली होती. हा सगळा खजिना फर्स्ट सेंचुरी एडीमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. यात तीनशे चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. सोबतच काही दागिनेही सापडले आहेत. डेनमार्कच्या होबरो शहरात स्थित या महालात हा खजिना सापडला होता. राजाचं नाव हेराल्ड ब्लूटूथ होतं.
एक्सपर्ट्सनुसार, ज्या दोन ठिकाणी खजिना सापडला तो कदाचित एकाच ठिकाणी असेल. पण इतक्या वर्षात एखाद्या चोराची यावर नजर पडली असेल तर त्यानेच तो दोन ठिकाणी लपवला असेल. दोन्ही वस्तू शंभर फुटाच्या अंतरावर सापडल्या आहेत.
ज्या खजिन्याबाबत लोकांनी केवळ कथा ऐकल्या होत्या, तो एका स्थानिक महिलेने शोधला. तिच्याकडे मेटल डिटेक्टर होतं. त्याने तिने चांदी शोधली. यात जी नाणी सापडली ती जर्मनी आणि मिडिल ईस्टमध्येही आढळतात. ही नाणी पाहिल्यावर स्टॉकहोल्म यूनिवर्सिटीचे कॉइन एक्सपर्ट जेन्स क्रिस्चियन मोएस्गार्ड यांनी सांगितलं की, ही नाणी राजाने प्रजेत वाटण्यासाठी तयार केली होती. होऊ शकतं की, ती दफन करण्यात आली असेल. आता या ठिकाणी अनेक एक्सपर्ट्स खोदकाम करत आहेत.