आपल्याच घरात फोनवर बोलत होती महिला, पोलिसांनी ठोठावला २७ हजार रूपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:29 PM2021-05-31T16:29:06+5:302021-05-31T16:42:44+5:30

रॉबिनसनने शेजारी महिलेचं एक ऐकलं नाही. ती फोनवर बोलत राहिली. ती शेजारी महिलेला म्हणाली की, तू माझ्या नजरेसमोरून निघून जा.

Woman fined for talking loudly at her own home | आपल्याच घरात फोनवर बोलत होती महिला, पोलिसांनी ठोठावला २७ हजार रूपयांचा दंड

आपल्याच घरात फोनवर बोलत होती महिला, पोलिसांनी ठोठावला २७ हजार रूपयांचा दंड

Next

आपल्याच घरात फोनवर बोलण्यावरून पोलीस एखाद्याला दंड कसा ठोठावू शकतात? कुणीही याचं नाही असं देणार. मात्र, अमेरिकेत अशी एक घटना समोर आली आहे. इथे एक महिला जोरजोरात आपल्या घरात फोनवर बोलत होती. पोलिसांनी तिला ३८५ डॉलर म्हणजे तब्बल २७ हजार रूपये दंड ठोठावला आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार या महिलेचं नाव Diamond Bobinson असं आहे. ती Cushing Street Eastpointe येथील आपल्या घरात कधी वर कधी खाली येत जात होती. तेव्हाच तिची शेजारी तिला म्हणाली की, 'तू तुझा फोन बाजूला ठेवू शकते का आणि हळू बोलू शकते का?'.

रॉबिनसनने शेजारी महिलेचं एक ऐकलं नाही. ती फोनवर बोलत राहिली. ती शेजारी महिलेला म्हणाली की, तू माझ्या नजरेसमोरून निघून जा. तीन मिनिटानंतर तिच्या घरी पोलीस आले. रॉबिनसन अधिकाऱ्यांना म्हणाली की, ती हे सगळं बोलणं फेसबुकवर लाइव्ह करेल. जेणेकरून लोकांना सत्य समजेल. ती रेकॉर्ड करणार इतक्यात पोलिसांनी तिला दंड ठोठावला. 

ती फेसबुक लाइव्हमध्ये म्हणाली की, तिला फोनवर बोलण्यासाठी दंड ठोठावण्यात आला आहे. जी पावती तिला मिळाली त्यावर लिहिले आहे की, तिच्या बोलण्याने आजूबाजूच्या लोकांना अडचण होत आहे. ती म्हणाली की, ती या दंडाचा विरोध करेल. ती तिच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज शेअर करेल. ती म्हणाली की, ती तिच्या प्रॉपर्टीमध्ये बोलत होती. यात दुसऱ्याला काय अडचण व्हावी.

ती म्हणाली की, तिला टार्गेट केलं जात आहे कारण ती एक कृष्णवर्णीय आहे. ज्या महिलेने पोलिसांना फोन केला होता, ती काही दिवसांपूर्वीच इथे शिफ्ट झाली. रॉबिनसन त्या महिलेला म्हणाली की, मी तुझं काय बिघडवलं होतं. काय तुला माझ्यापासून काही त्रास आहे. अखेर हे सुरू काय आहे'. शेजारी महिला यावर काहीही बोलली नाही.
 

Web Title: Woman fined for talking loudly at her own home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.