कारच्या टायरमध्ये लपला होता अजगर, पाहून महिलेची चांगलीच उडाली भांबेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 18:58 IST2020-08-09T18:57:45+5:302020-08-09T18:58:57+5:30
पोलिसांनी अजगराला सुखरूप बाहेर काढले आणि त्याला अॅनिमल सर्व्हिसमध्ये पाठविले.

कारच्या टायरमध्ये लपला होता अजगर, पाहून महिलेची चांगलीच उडाली भांबेरी
न्यू मेक्सिकोमध्ये एका महिलेच्या कारच्या टायरमध्ये अजगर लपून बसला होता. या अजगराला पाहून त्या महिलेची चांगलीच भांबेरी उडाली. कारच्या टायरमध्ये लपून बसलेला अजगर पाहिल्यानंतर या महिलेना आरडाओरड केली. त्यानंतर तिने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलीस अधिकाऱ्यांना अजगराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. रोझवेल पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना तीन फूट लांबीचा हा अजगर टायरमधून कारच्या इंजिनवर गेलेला आढळला. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
पोलीस विभागाने सांगितले की, ही घटना 2 ऑगस्टच्या रात्री घडली. त्या महिलेच्या कारच्या टायरमध्ये तीन फूट अजगर बसला होता. त्यानंतर तिने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत अजगर कारच्या टायरमधून इंजिनमध्ये गेला होता. त्यानंतर पोलिसांनी अजगराला इंजिनमधून सुखरूप बाहेर काढले आणि त्याला अॅनिमल सर्व्हिसमध्ये पाठविले.
ही पोस्ट 4 ऑगस्टला शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला100 हून अधिकवेळा शेअर करण्यात आले असून 200 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. पोलिसांनी पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, 'अजगर सोमवारी (3 ऑगस्ट) सकाळी शहरातील प्राणी निवारा केंद्रामध्ये ठेवला आहे. जर चार दिवसांत अजगराचा मालक आला नाही, तर अजगराला अॅडॉब्शनसाठी ठेवले जाईल.