दुकानाच्या साइन बोर्डच्या आत राहत होती महिला, वर्षभर राहिल्यावर झाला खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:58 AM2024-05-13T10:58:30+5:302024-05-13T11:00:13+5:30
हैराण करणारी बाब म्हणजे या जागेवर महिला एक वर्षापासून राहत होती आणि कुणाला दिसलीही नाही.
गरीब लोक ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागाही नसते हे लोक डोक्यावर छप्पर शोधण्यासाठी कुठेही राहतात. कुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली राहतात तर कुणी पुलाखाली राहतात. पण अमेरिकेच्या मिशिगनमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. इथे एका बेघर महिला एका सुपरशॉपीच्या टेरेसवर लागलेल्या साइन बोर्डच्या आत राहत होती. हैराण करणारी बाब म्हणजे या जागेवर महिला एक वर्षापासून राहत होती आणि कुणाला दिसलीही नाही.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, एक महिला मिडलॅंड, मिशिगनमध्ये एका किराण्याच्या दुकानाच्या टेरेसवर जवळपास एक वर्षापासून राहत होती. पोलिसांनी सांगितलं की, महिला 23 एप्रिलला इथे राहत असल्याचं उघड झालं.
मिडलॅंड डेली न्यूजने सगळ्यात आधी महिला इथे आढळल्याची बातमी दिली होती. 34 वर्षीय महिला नोकरी करत होती. असंही सांगण्यात आलं की, महिलेने ही जागा मिनी डेस्क, टाइल्स, पेंट्री आणि हाउसप्लांटने सजवली होती. एसीबी न्यूजनुसार, पोलिसांनी सांगितलं की, महिलेकडे एक केयूरिंग कॉफी मेकर, एक प्रिंटर आणि कॉम्प्युटरही आढळलं.
असंही समोर आलं की, महिला बेघर होती पण विवाहित होती. पण हे अजूनही स्पष्ट झालं नाही की, महिला टेरेसवर कशी पोहोचली आणि तिला तिथून काढल्यावर ती आता कुठे राहत आहे.
पोलिसांनी सांगितलं की, महिलेवर अजून कोणताही आरोप लावण्यात आलेला नाही. पोलिसांनी महिलेला “रूफटॉप निंजा” असं नाव देण्यात आलं आहे. महिलेबाबत पोलिसांनी फार कमी माहिती दिली ज्यात याचाही समावेश आहे की, ती इथे का राहत होती?