बोंबला! लग्नानंतर ३ महिन्यांतच महिलेला झालं बाळ; गॅसमुळे पोट फुगल्याचं सांगत पतीला गंडवत राहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 11:53 AM2021-08-26T11:53:58+5:302021-08-26T11:54:15+5:30

१८ मार्चला लोहियानगरमध्ये राहणाऱ्या एका मुलीचं लग्न मोहन नगरमधील तरूणासोबत झालं होतं. लग्नाच्या काही दिवसातच मुलीचं पोट वाढताना दिसत होतं.

UP woman gave birth to a child after 3 months of marriage husband filed a case for cheating | बोंबला! लग्नानंतर ३ महिन्यांतच महिलेला झालं बाळ; गॅसमुळे पोट फुगल्याचं सांगत पतीला गंडवत राहिली

बोंबला! लग्नानंतर ३ महिन्यांतच महिलेला झालं बाळ; गॅसमुळे पोट फुगल्याचं सांगत पतीला गंडवत राहिली

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक महिला लग्नाच्या काही महिन्यातच आई बनली. लग्नानंतर महिला आई होणं सामान्य बाब आहे. पण इथे जरा वेगळीच भानगड समोर आली आहे. सुरूवातीला पत्नीच्या शरीरात काही बदल दिसल्याने पतीने त्याबाबत विचारले तर पत्नी म्हणाली गॅसमुळे पोट फुगलं. पण अल्ट्रासाउंडमध्ये तिची पोलखोल झाली. त्यानंतर पती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पत्नीसह तिच्या परिवारावर फसवणूक केल्याचा आरोप लावला.

आजतकने एका वृत्तपत्रातील बातमीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, १८ मार्चला लोहियानगरमध्ये राहणाऱ्या एका मुलीचं लग्न मोहन नगरमधील तरूणासोबत झालं होतं. लग्नाच्या काही दिवसातच मुलीचं पोट वाढताना दिसत होतं. पतीने नेहमी विचारलं की पत्नी गॅसची समस्या असल्याचं सांगत होती. पतीनेही काही दिवस त्याकडे दुर्लक्ष केलं. 

महिला पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पती म्हणाला की, एका महिन्यातच पत्नीने सांगितलं की, ती गर्भवती आहे. ही बातमी ऐकून तो आनंदी झाला. कोरोनाची दुसरी लाट असल्याने डॉक्टर व्हिडीओ कॉलवरूनच समस्या विचारून औषध देत होता. अशात २५ जूनला चेकअपसाठी डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात बोलवलं आणि पत्नीचं पितळ उघडं पडलं. (हे पण वाचा : बोंबला! लग्नात बोलवलं नाही म्हणून गावातील व्यक्तीने नवरदेवाला केली मारहाण, दारूसाठी पैसेही घेतले)

डॉक्टरने सांगितलं की, महिलेल्या पोटातील बाळ ८ महिन्यांपेक्षा जास्तचं आहे आणि डिलेव्हरी कोणत्याही क्षणी होऊ शकते. तेव्हा दोघांच्या लग्नाला केवळ ३ महिने झाले होते. त्यानंतर पती संतापला आणि त्याने गोंधळ घातला. त्यानंतर महिलेचे आई-वडील तिला माहेरी घेऊन गेले.  (हे पण वाचा : पत्नीचं भावोजीसोबत सुरू होतं अफेअर, वैतागून नाराज पतीने उचललं धक्कादायक पाउल)

२६ जून रोजी महिलेने एका मुलाला जन्म दिला. पतीचा आरोप आहे की, त्याची फसवणूक करून हे लग्न लावून देण्यात आलं. त्याला हे लग्न मान्य नाही. सद्या पतीने न्यायासाठी कोर्टाकडे धाव घेतली आहे. तर तिकडे महिला टेंशनमध्ये आहे.
 

Web Title: UP woman gave birth to a child after 3 months of marriage husband filed a case for cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.