कडक सल्यूट! रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये महिलेने दिला मृत बाळाला जन्म, पोलिसांनी 'असं' दिलं जीवनदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 01:29 PM2020-07-20T13:29:37+5:302020-07-20T13:38:03+5:30

एका महिलेने रेल्वे स्टेशनच्या बाथरूममध्ये एका मुलीला जन्म दिला. पण मुलगी श्वास घेत नव्हती किंवा रडतही नव्हती. घाबरलेली महिला बाळाला घेऊन बाहेर आली.

Woman gave birth to dead baby girl while urinating at railway station then officers did this magic giving cpr | कडक सल्यूट! रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये महिलेने दिला मृत बाळाला जन्म, पोलिसांनी 'असं' दिलं जीवनदान!

कडक सल्यूट! रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये महिलेने दिला मृत बाळाला जन्म, पोलिसांनी 'असं' दिलं जीवनदान!

Next

आई होण्याचा आनंद हा एका महिलेसाठी सर्वात मोठा आनंद असतो. पण अनेकदा प्रसुतीदरम्यान अशी घटना घडते की, आनंद दु:खात बदलतो. अशीच एक घटना न्यू जर्सीमध्ये समोर आली आहे. इथे एका महिलेने रेल्वे स्टेशनच्या बाथरूममध्ये  एका मुलीला जन्म दिला. पण मुलीचा श्वास सुरू नव्हता. जेव्हा महिला बाळाला घेऊन बाहेर आली तेव्हा दोन पोलिसांनी बाळाचा जीव वाचवला. बाळ पुन्हा श्वास घेऊ लागलं होतं. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे.

न्यूजर्सीतील एका महिलेने रेल्वे स्टेशनच्या बाथरूममध्ये एका मुलीला जन्म दिला. पण मुलगी श्वास घेत नव्हती किंवा रडतही नव्हती. घाबरलेली महिला बाळाला घेऊन बाहेर आली तेव्हा तिथे असलेल्या दोन पोलिसांची तिच्यावर नजर पडली.

ऑफिसर ब्रायन रिचर्ड आणि अल्बर्टो नून्सने लगेच बाळाला जवळ घेतलं. त्यांनी बाळाला टॉयलेट बेसीनमध्ये उलटं पकडलं आणि तिला श्वास देण्याचा प्रयत्न केला. ऑफिसर लागोपाठ तिला सीपीआर देत होते. तसेच तिच्या छातीवरही जोर देत होते. बराचवेळ प्रयत्न केल्यावर बाळाची हालचाल जाणवली.

त्यानंतर लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आता उपचारानंतर बाळ व्यवस्थित आहे. ही संपूर्ण घटना पोलीस ऑफिसरच्या बॉडी कॅमेरात कैद झाली आहे. यात ऑफिसर बाळाचा जीव वाचवताना दिसत आहे. महिलेला अजिबात अंदाज नव्हता की, तिची आता डिलेव्हरी होईल.

बाळाचा वाचवल्याने दोन्ही पोलिसांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा फार आनंद झाला होता. आता बाळ आणि तिची आई दोघी ठिक आहे. बाळाच्या आईने दोन्ही पोलिसांचे आभार मानले. ती म्हणाली की, आज दोघेही नसते तर तिचं बाळ जिवंत राहिलं नसतं.

Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच!

तहानलेल्या खारूताईनं पाण्यासाठी केली अशी विनवणी; Video पाहून व्हाल इमोशनल!

Web Title: Woman gave birth to dead baby girl while urinating at railway station then officers did this magic giving cpr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.