Boss च्या बाळाची आई झाली ऑफिसमधील कर्मचारी महिला, जाणून घ्या का उचललं असं पाउल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:59 PM2021-04-07T12:59:59+5:302021-04-07T13:02:54+5:30
डेली मेलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, कॅटलिनची बॉस तीनवेळा गर्भवती झाली होती. पण तिला आई होण्याचा आनंद एकदाही मिळाला नाही.
यूनायडेट किंगडम एल्डर्नीमध्ये एका महिलेकडून आपल्या बॉसचं दु:खं बघितलं गेलं नाही. अशात तिने बॉसच्या बाळाला जन्म दिला. कॅटलिन कॉटन असं या महिलेचं नाव असून ती आधीच दोन मुलांची आई आहे. तिला एक ६ वर्षाचं आणि एक ५ वर्षाचं मुल आहे. जेव्हा कॅटलिनला समजलं की, तिची बॉस केट कधीच आई होऊ शकणार नसल्याने हैराण आहे. तर तिला दया आली आणि ती यासाठी तयार झाली.
डेली मेलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, कॅटलिनची बॉस तीनवेळा गर्भवती झाली होती. पण तिला आई होण्याचा आनंद एकदाही मिळाला नाही. दोनदा तिने मृत बाळांना जन्म दिला तर एकदा तिचं मिसकरेज झालं होतं. केट एक डिजिटल मीडिया कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर आहे. कॅटलिन याच कंपनीत मार्केटिंग असिस्ंट म्हणून काम करते. आता केटचं बाळ १ वर्षांचं झालं आहे. (हे पण वाचा : आश्चर्य! तीन गुप्तांगासोबत जन्माला आलं बाळ, डॉक्टरही झाले हैराण!)
केट म्हणाली की, कॅटलिनने मला माझं बाळ देऊन माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की, हे खरं आहे. कॅटलिन आता केवळ माझी मैत्रिणच नाही तर ती माझ्या परिवाराचा भाग झाली आहे. मी तिच्यासाठी काहीही करू शकते. तिने माझ्यावर नेहमी उपकार राहतील. तिने मला जगातलं सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे.
कॅटलिनने सांगितलं बॉसला मदत करण्याचं कारण
कॅटलिन म्हणाली की, ऑफिसमध्ये काम करणारे माझे काही सहकारी माझ्यावर हसतात आणि म्हणतात की, मी इम्पलॉय ऑफ द मंथ बनण्यासाठी काही जास्तच केलं आहे. तर मी त्यांना म्हणाले की, दररोज तुम्ही बॉसचं काम करत नसता. मला केटची अडचण आणि तिचं दु:खं समजलं होतं. मला तिची मदत करून आनंद मिळाला.
केटने सांगितले की, तीन वेळा आई होऊ शकल्यानंतरही मी कधी सरोगसीबाबत विचार केला नाही. पण जेव्हा पहिल्यांदा सरोगसीचा विचार आला तर मला तो आवडला. एक दिवस मी याबाबत कॅटलिनसोबत बोलले आणि ती सरोगसी म्हणजे गर्भ भाड्याने देण्यास तयार झाली. कॅटलिन म्हणाली की, बॉसचं बााळ आपल्या पोटात ठेवणं तिच्यासाठी आनंदाची बाब असेल.