बाबो! आपल्या भावालाच जन्म देणार आहे ही महिला, ट्रोल होताच दिलं सडेतोड उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2022 06:54 PM2022-07-17T18:54:04+5:302022-07-17T18:55:59+5:30

आईऐवजी बहीणच आपल्या भावाला जन्म देणार आहे. महिलेने आपल्या पोटात आपला भाऊ असल्याचं सांगन सर्वांनाच धक्का दिला आहे.

woman gives birth to her own cousin | बाबो! आपल्या भावालाच जन्म देणार आहे ही महिला, ट्रोल होताच दिलं सडेतोड उत्तर

बाबो! आपल्या भावालाच जन्म देणार आहे ही महिला, ट्रोल होताच दिलं सडेतोड उत्तर

Next

सामान्यपणे एक आई आपल्या बाळाला जन्म देते. तिने जन्म दिलेल्या मुलांमध्ये बहीण-भावाचं नातं असतं. पण सध्या असं एक प्रकरण चर्चेत आलं आहे, ज्यात आई नव्हे तर बहिणीच्या पोटात भाऊ वाढतो आहे. आईऐवजी बहीणच आपल्या भावाला जन्म देणार आहे. महिलेने आपल्या पोटात आपला भाऊ असल्याचं सांगन सर्वांनाच धक्का दिला आहे.

कॅनडातील राहणारी कायले तीन मुलांची आई आहे पण आता तिच्या पोटात तिचाच भाऊ आहे. लवकरच ती आपल्या भावाला जन्म देणार आहे. कायलेच्या पोटातील हे बाळ म्हणजे तिचा चुलत भाऊ आहे. कायले आपल्या काका-काकीच्या मुलांची सरोगेट मदर झाली आहे.

कायलेचे काका-काकी कित्येक वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना मूलच होत नव्हतं. मूल नसल्याने काका-काकींना होणारं दुःख तिला पाहवालं नाही. त्यामुळे तिने आपल्या कुटुंबासमोर आपला एक विचार ठेवला. सरोगसीमार्फत काका-काकीच्या बाळाला जन्म देण्याबाबत तिने सांगितलं. सुरुवातीला तिचं कुटुंब मानलं नाही. पण तिची निःस्वार्थ भावना पाहून तिचे काका-काकी तयार झाले. अखेर कायले आपल्या काका-काकींच्या मुलाची सरोगेट मदर झाली.

आपण हा निर्णय का घेतला याबाबत सांगता कायले म्हणाली,  2016 साली तिने आपलं एक मूल गमावलं होतं. कित्येक वर्षे ती त्या दुःखातून बाहेर पडत नव्हती. मुलासाठी, त्याच्या प्रेमासाठी तिचा जीव आसुसला होता. मूल न होण्याच्या वेदना ती समजू शकत होती. त्यामुळे काका-काकींना मूल होत नसल्याने त्यांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी तिने हा निर्णय घेतला.

आपल्या भावाला जन्म देणार असल्याने, आपल्यामुळे आपल्या कुटुंबात आनंद येणार असल्याने कायले खूप आनंदी आहे. पण लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. कायले हे पैशांसाठी करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. लोक काय म्हणतात याचा कायलेला काहीच फरक पडत नाही.

आपल्या इथं पैशांसाठी सरोगसी कायद्याने गुन्हा असल्याचं सांगितलं आहे. वैद्यकीय खर्चांशिवाय सरोगेट मदर दुसरं काहीच घेत नाही, हे तिने स्पष्ट केलं. काही प्रकरणात गरजू महिला असं करतात पण आपण आपल्या कुटुंबासाठी करत आहोत आणि त्यात काहीच चुकीचं नाही, असं ती म्हणाली.

Web Title: woman gives birth to her own cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.