असाही आजार! आकर्षक पुरूष दिसला की लगेच डगमगते ही महिला, रस्त्याने खाली मान घालून चालणं भाग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 09:56 IST2021-03-25T09:40:07+5:302021-03-25T09:56:20+5:30
३२ वर्षीय क्रिस्टी ब्राउन इंग्लंडच्या चेशायर शहरात राहते. तिला केटाप्लेक्सीची समस्या आहे. हा एक असा आजार आहे ज्यात राग, आनंद आणि भितीसारख्या स्ट्रॉंग इमोशनमुळे समस्या होऊ शकते.

असाही आजार! आकर्षक पुरूष दिसला की लगेच डगमगते ही महिला, रस्त्याने खाली मान घालून चालणं भाग!
जगात असे असे आजार आहेत ज्यावर आपला विश्वासही बसत नाही. इंग्लंडमधील एक महिला अशाच विचित्र आजाराने ग्रस्त आहे. या दुर्मीळ आजारामुळे तिला सार्वजनिक ठिकाणी मान खाली करून चालावं लागतं. कारण जेव्हाही ती एखाद्या आकर्षक पुरूषाला बघते तेव्हा तिचे पाय डगमगतात आणि ती खाली पडण्याची भिती असते.
३२ वर्षीय क्रिस्टी ब्राउन इंग्लंडच्या चेशायर शहरात राहते. तिला केटाप्लेक्सीची समस्या आहे. हा एक असा आजार आहे ज्यात राग, आनंद आणि भितीसारख्या स्ट्रॉंग इमोशनमुळे समस्या होऊ शकते. ज्यामुळे अचानक मांसपेशींमध्ये पॅरालिलीससारखी स्थिती निर्माण होते आणि क्रिस्टी अडखळते. तिला निट चालताही येत नाही.
या समस्येला नारकोलेप्सीसोबत जोडून बघितलं जातं. क्रिस्टीने तिच्या या समस्येबाबत सांगितले की, ही फारच लाजिरवाणी समस्या आहे. मी जेव्हाही एखाद्या आकर्षक-गुड लुकिंग पुरूषाला बघते तेव्हा माझे पाय थरथरू लागतात. माझा तोल जातो आणि मी जर मला सांभाळलं नाही तर मी खाली पडण्याची भिती असते. त्यामुळे मी माझ्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी मान करून चालते.
क्रिस्टी सांगते की, तिला सामान्यपणे पाच केटाप्लेक्सीचे अटॅक येतात आणि जर दिवस वाईट असेल तर तिला एका दिवसात याचे ५० अटॅकही येऊ शकतात. त्यामुळे अनेकदा तिचं घरातून बाहेर निघणंही अवघड होतं. क्रिस्टी सांगते की, हा अटॅक २ मिनिटांपेक्षा कमी वेळात संपतो.
क्रिस्टीने सांगितले की, मला राग आल्यावर किंवा मी जोरात हसल्यावरही मला खाली पडण्याची भिती राहते. कारण हेही स्ट्रॉंग इमोशन आहे. नेहमीच असं होतं की, जेव्हा मी कुणासोबत वाद घालत असते तेव्हा मी बेशुद्ध पडते आणि वाद तिथेच संपतो. ती म्हणाली की, जेव्हा मला अटॅक येतो तेव्हा माझा माझ्या पायांवरचा कंट्रोल संपतो.
क्रिस्टीने सांगितले की, ती नारकोप्लेसी जीनसोबत जन्माला आली होती आणि ९ वर्षांची असताना तिला डोक्यावर झालेल्या जखमेमुळे तिची ही समस्या अधिक वाढली. ती म्हणाली की, या समस्येमुळे तिला जॉब मिळवणंही अवघड झालं. कारण तिला लोकांना हे समजावण्यात फार वेळ जातो की, ती कधीही डगमगून खाली पडू शकते.