सूनेवर सासूला होता संशय, नातीची केली डीएनए टेस्ट; समोर आलं असं काही बसला धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 09:19 AM2024-04-09T09:19:56+5:302024-04-09T09:37:01+5:30
सूनेला जेव्हा मुलगी झाली तेव्हा तिचे डोळे हिरवे होते. सासूला हे समजलं नाही कारण तिच्या घरात कुणाचेच डोळे हिरवे नाहीत.
जास्तीत जास्त हेच बघायला मिळतं की, सासू-सूनेचं नातं सामान्य नसतं. त्यांच्या काही वैचारिक मतभेद असतात. संशय, अपेक्षा या गोष्टींमुळे काहीना काही सुरू असतं. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. तिने तिची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली. सासूला संशय होता की, तिच्या सूनेचं कुणासोबत तरी अफेअर सुरू आहे. ती पतीला दगा देत आहे. हे सिद्ध करण्यासाठी सासूने नातीची डीएनए टेस्ट केली. पण यातून असं सत्य समोर आलं ज्याने सासूला धक्का बसला.
मिररच्या रिपोर्टनुसार, सूनेला जेव्हा मुलगी झाली तेव्हा तिचे डोळे हिरवे होते. सासूला हे समजलं नाही कारण तिच्या घरात कुणाचेच डोळे हिरवे नाहीत. अशात सासूचा संशय आणखी वाढला. अशात सासू सूनेला खूपकाही बोलली आणि सून मुलीची डीएनए टेस्ट करण्यासाठी तयार झाली. पण असं करत असताना सासूचं 29 वर्षाआधीचं एक रहस्य समोर आलं.
महिलेने रेडिटवर लिहिलं की, मी दोन महिन्यांआधी मुलीला जन्म दिला. पतीचा विश्वास आहे की, मी त्याला दगा देऊ शकत नाही. तरीही मला मुलीच्या डीएनए टेस्टसाठी तयार व्हावं लागलं. कारण तिच्या डोळ्यांचा रंग हिरवा होता आणि माझे व पतीचे डोळे हिरवे नव्हते. माझ्या घरातही कुणाचे डोळे हिरवे नव्हते. माझ्या सासूला यावर संशय आला.
महिलेने लिहिलं की, माझा पती मला डीएनए टेस्टसाठी नाही म्हणत होता. पण त्याला माझ्यावर विश्वास होता. पण सासू काही गप्प बसली नाही. तिला संशय होता की, माझं बाहेर अफेअर आहे. सासूमुळे मी मुलीची डीएनए टेस्ट केली. रिपोर्टमध्ये सिद्ध झालं की, मुलगी आमचीच आहे. पण जेव्हा आम्ही पूर्ण रिपोर्ट पाहिला तेव्हा एक हैराण करणारी बाब समोर आली. तेव्हा समजलं की, माझी मुलगी तर माझी आहे, पण माझे सासरे माझ्या पतीचे वडील नाहीत.
मिररच्या रिपोर्टनुसार, रेडिटवर महिलेने सांगितलं की, आमच्या डोक्यात कधीच विचार आला नाही की, माझी सासू कधी सासऱ्यांना दगा देऊ शकते. रिपोर्ट पाहिल्यावर माझ्या पतीला आईसोबत बोलायचं होतं. पण त्याला वाट बघण्यासाठी सांगितलं. कारण आम्हाला आणखी वाद वाढवायचा नाही. माझ्या पतीला त्याच्या वडिलाना शोधायचं आहे. यातून हाती काहीच लागणार नाही. मला त्याला केवळ मानसिक शांतता द्यायची आहे.