सेलिब्रिटींसारखे डोळे हवे म्हणून कॉस्मॅटिक सर्जरी केली, डोक्यावर शिंग उगवली ना राव!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 05:11 PM2022-03-04T17:11:33+5:302022-03-04T17:16:08+5:30
हल्ली काही लोक कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic surgery) करून घेतात. अशी सर्जरी एका महिलेने केली. ज्याच्या भयंकर परिणामांना तिला आता सामोरं जावं लागतं आहे. विशिष्ट आकाराचे डोळे मिळवण्यासाठी तिने सर्जरी केली पण यानंतर तिच्या डोक्यावर चक्क शिंगं उगवली.
अनेकांना आपली नैसर्गिक शरीररचना आवडत नाही. मग आपल्यातील उणीव पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्याला हवं तसं शरीर मिळवण्यासाठी हल्ली काही लोक कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic surgery) करून घेतात. अशी सर्जरी एका महिलेने केली. ज्याच्या भयंकर परिणामांना तिला आता सामोरं जावं लागतं आहे. विशिष्ट आकाराचे डोळे मिळवण्यासाठी तिने सर्जरी केली पण यानंतर तिच्या डोक्यावर चक्क शिंगं उगवली.
सामान्यपण सुंदर डोळ्यांना कमळाची उपमा दिली जाते. म्हणजे एखाद्या तरुणीचे सुंदर डोळे पाहिले की तिचे डोळे कमळासारखे आहेत, असं म्हटलं जातं आहे. पण आता फक्त कमळासारखे नव्हे तर बऱ्याच आकाराच्या डोळ्यांचं वेड लोकांना लागलं आहे आणि त्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय आहे. टिकटॉक स्टार जेसी कारने (TikTok star Jessie Carr) अशीच सर्जरी केली. तिला काही सेलिब्रिटींच्या डोळ्यांसारखे फॉक्स आय (Fox Eye) हवे होते. आपल्या डोळ्यांना फॉक्स आयचा लूक देण्यासाठी तिने कॉस्मेटिक सर्जरीही केली. त्यासाठी तिने बरेच पैसे खर्च केले.
फॉक्स आय सर्जरीचा (Fox Eye Surgery) रिझल्ट पाहून सुरुवातीला ती खूप खूश झाली. पण काही दिवसांनंतर तिने आपला चेहरा पाहिला तेव्हा तिला धक्का बसला. जेव्हा सर्जरी हळूहळू बरी होऊ लागली, तसतसा तिच्या चेहऱ्यावर बदल दिसू झाला. असा अनपेक्षित बदल पाहून ती घाबरली. तिचे डोळे कोल्ह्यासारखे नाही झाले पण तिच्या डोक्यावर शिंगं उगवली (Horn on head). तिच्या डोळ्यांवरील सर्जरीचे धागे पूर्णपणे दिसू लागले आणि फुलून शिंगासारखे वर आले. तिने आपला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. चुकीच्या पद्धतीने सर्जरी केल्याने असं झाल्याचा आरोप तिने केला आहे. यासाठी ज्या डॉक्टरांकडून सर्जरी करून घेतली त्यांच्याकडे तिने ही चूक नीट करण्याच्या सर्जरीसाठी डिस्काऊंट मागितला आहे.
फॉक्स आयसाठी तिने केलेल्या कॉस्मेटिक सर्जरीत बायोडिग्रेडेबल धाग्यांमार्फत डोळ्यांना थोडं वर उचललं जातं. पण याचे काही वेगळा वेगळे दुष्परिणामही दिसून येतात. सर्जरीच्या प्रक्रियेवेळी तिच्या एका रक्तवाहिनीवर परिणाम झाला आणि सर्वकाही बिघडलं. आता ही सर्व ठिक करण्यासाठी ती अल्टाफॉर्मर नावाची एक प्रक्रिया करत आहे. ज्याधम्ये चेहऱ्यावर दिसणारे धागे कमी दिसू लागतील. कोल्ह्यासारख्या डोळ्यांऐवजी डेव्हिलसारखी शिंग आली.