"मुलाला बॉयफ्रेंड समजतात लोक"; तरुण दिसण्यासाठी महिलेने केल्या 200 सर्जरी, सांगितलं खरं वय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 11:45 AM2023-05-08T11:45:35+5:302023-05-08T12:00:46+5:30
महिलेने कायमस्वरूपी तरुण दिसण्यासाठी 200 हून अधिक सर्जरी केल्या आहेत आणि आतापर्यंत 8 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत.
एका महिलेने कायमस्वरूपी तरुण दिसण्यासाठी 200 हून अधिक सर्जरी केल्या आहेत आणि आतापर्यंत 8 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत. ती सहा मुलांची आई आहे. टीव्ही पर्सनेलिटी आणि मॉडेल लेसी वाइल्डने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पुरुषाला तिला डेट करायचं असतं आणि प्रत्येक मुलगी तिचा तिरस्कार करते. ती स्वत:ला 'मिलियन डॉलर बार्बी' म्हणते.
द सनच्या रिपोर्टनुसार, लेसीचं खरं नाव पॉला थेबर्ट आहे. तिला डॉक्टरांनी यापुढे कोणतीही सर्जरी न करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच लेसी असेही सांगते की ती इतर महिलांना तिच्यासारख्या जीवनशैलीपासून दूर राहण्याचा सल्ला देते. पण तिला पुरुषांचे लक्ष वेधून घेणं जास्त आवडतं.
लेसी ही अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील रहिवासी आहे. ती म्हणते, 'मुली माझा तिरस्कार करतात. प्रत्येक मुलाला मला डेट करायचे असते. वयाच्या 55 व्या वर्षी प्लास्टिक सर्जरीने मला परिपूर्ण बनवलं आहे. मी जवळपास 30 वर्षांची दिसते.
लेसी म्हणते, 'माझा मुलगा 35 वर्षांचा आहे आणि लोकांना तो माझा बॉयफ्रेंड वाटतो. मी सिंगल असून करोडपती लोकांसाठी उपलब्ध. एखाद्याशी डेटिंग करणं कठीण आहे. त्यांना मी माझ्या शरीरामुळे आवडते किंवा मग स्टेटसमुळे. आपल्या तरुण दिसण्यामागचं श्रेयही तिने आपल्या कुटुंबाला दिलं आहे.
लेसीने तिच्या सहा मुलांना एकट्याने वाढवलं आहे. तिने 2011 मध्ये आलेल्या ट्रू लाईफ या डॉक्युमेंट्री सीरीजमध्ये काम केले आहे. यामध्ये तिची मुलगी टोरीही तिच्यासोबत होती. त्याच वेळी, लेसीने वयाच्या 24 व्या वर्षी तिच्या आयुष्यातील पहिली सर्जरी केली होती. तेव्हापासून ती प्लास्टिक सर्जरीची फॅन झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.