एक केस कापला अन् महिलेचे नशीबच पलटले, झाली मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 07:16 PM2021-08-13T19:16:24+5:302021-08-13T19:23:25+5:30
एका व्यक्तीने राहिलेले केस कापण्याचे पैसे दिले. त्याने फक्त पैसेच दिले नाही तर इतके पैसे दिले कि त्याचे जिने केस कापले तिच्या ड़ोळ्यात अक्षरश: पाणी तरळले.
तुम्ही केसं कापायला सलुनमध्ये जात असालच. अशावेळी समजा तुमचे काही केस तसेच राहुन गेले तर परत जायची वेळही येत असेल. पण तुम्ही पुन्हा राहिलेले केस कापायचे पैसे देत नसाल. पण एका व्यक्तीने राहिलेले केस कापण्याचे पैसे दिले. त्याने फक्त पैसेच दिले नाही तर इतके पैसे दिले कि त्याचे जिने केस कापले तिच्या ड़ोळ्यात अक्षरश: पाणी तरळले.
एका महिलेच्या दुकानात केस कापायला एक व्यक्ती येतो. त्या व्यक्तीला फक्त एक केस कापायचा असतो. आदल्या दिवशी तो याच सलूनमध्ये केस कापून गेलेला असतो पण तो केस राहिल्यामुळे तो परत येतो. केस कापणारी ती महिला त्याच स्वागतच करते. ती त्याला सांगते की, गेल्या २० वर्षापासून ती केस कापतेय. काहीवेळा असं होऊ शकतं. म्हणून मी यासाठी कोणताही चार्ज आकारणार नाही.
तो तिला पैसे देऊ करतो पण ती घेत नाही. मग तो तिला टिप तरी घेणार का? असा प्रश्न विचारतो. त्यावर ती महिला होकार देते. हा व्यक्ती फक्त एक केस कापण्यासाठी त्या महिलेला तब्बल ५०० डॉलर्स देतो. हे पाहुन त्या महिलेच्या डोळ्यात अश्रु येतात. ती त्याला सांगते गेले कित्येक दिवस ती दुकानाचं भाडं भरु शकत नव्हती या पैशातून ती भरु शकते.