या महिलेला आहे चक्क नवऱ्याची अॅलर्जी!
By admin | Published: January 24, 2017 04:01 PM2017-01-24T16:01:19+5:302017-01-24T16:01:19+5:30
अमेरिकेतील मिनिसोटा राज्यातील जोहाना वॉटकिन्स या महिलेला असलेल्या अॅलर्जीबाबत वाचून तुम्हाला धक्काच बसेल.
Next
> ऑनलाइन लोकमत
मिनिसोटा, दि. 24 - अॅलर्जीचा त्रास अनेकांना असतो. कुणाला कशाची अॅलर्जी असेल सांगता येत नाही. काही जणांना धूळ, धूर, वास यांची अॅलर्जी असते. गोड, आंबट पदार्थांची अॅलर्जी असलेल्यांबद्दलही तुम्ही ऐकले असेलच. पण अमेरिकेतील मिनिसोटा राज्यातील जोहाना वॉटकिन्स या महिलेला असलेल्या अॅलर्जीबाबत वाचून तुम्हाला धक्काच बसेल. या 29 वर्षिय महिलेला चक्क नवऱ्याचीच अॅलर्जी आहे.
मिनिसोटा राज्यात राहणारी जोहाना हिचे लग्न झाले आहे. पण लग्नानंतरही तिला आपल्या पतीच्या सहवासापासून दूर राहावे लागत आहे. त्याचे कारण आहे तिला असलेली नवऱ्याची अॅलर्जी. या अजब अॅलर्जीमुळे ती नवऱ्याजवळ गेली तरी तिचा जीव धोक्यात पडू शकतो. खरंतर जोहाना हिला मेस्ट सेल अॅक्टिवेशन सिंड्रोम नावाचा विचित्र आजार आहे. त्यामुळे तिला जवळपास प्रत्येच वस्तूची अॅलर्जी आहे. फॉक्स 9 या प्रसिद्धी माध्यमाने या संदर्भात वृत्त दिले आहे.
अॅलर्जीमुळे जोहानाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अॅलर्जीमुळे तिच्या घराचीही सध्या पुनर्रचना करण्यात येत आहे. जेणेकरून या घरात तिला अॅलर्जीचा त्रास होणार नाही. सध्या ती आपल्या पतीसह एका मैत्रिणीच्या घरी राहतेय. पण तिला असलेली पतीची सोबत मात्र नाममात्र आहे. कारण अॅलर्जीमुळे तिला नवऱ्याजवळ जाता येत नाही.